Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयपीएल 15 वा हंगाम : 26 मार्चपासून सुरू होणार !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

आयपीएल 15 वा हंगाम : 26 मार्चपासून सुरू होणार !

Surajya Digital
Last updated: 2022/02/20 at 7:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आयपीएलचा 15 वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. त्यातच आता मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल 2022 ची सुरूवात 26 मार्चपासून होऊ शकते. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार स्टार स्पोर्ट्स 26 मार्च म्हणजेच शनिवारपासून स्पर्धा सुरू करण्यासाठी आग्रही आहे. तसेच शनिवारी स्पर्धा सुरू झाली तर रविवारी दोन मॅच होऊ शकतात. दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 10 टीम खेळणार आहेत.

आयपीएल 2021 (IPL 2021) चा मोसम कोरोनामुळे प्रभावित झाला होता. आयपीएलचा पहिला राऊंड भारतात तर दुसरा राऊंड युएईमध्ये पार पडला, तर आयपीएल 2020 चं संपूर्ण आयोजन युएईमध्येच झालं होतं.

आता मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल 2022 ची सुरूवात 26 मार्चपासून होऊ शकते. आधी 27 मार्चपासून आयपीएलला सुरूवात होईल, असं सांगितलं जात होतं. प्रसारणकर्ता स्टार स्पोर्ट्स आणि बीसीसीआय यांच्यात याबाबत चर्चा सुरू आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 10 टीम खेळणार आहेत.

मागच्या आठवड्यात झालेल्या आयपीएल लिलावात 204 खेळाडूंवर सगळ्या टीमनी बोली लावली होती, तर 33 खेळाडूंना जुन्या 8 टीमनी आधीच रिटेन केलं होतं. म्हणजे यंदाच्या मोसमात एकूण 237 खेळाडू मैदानात उतरतील. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार स्टार स्पोर्ट्स 26 मार्च म्हणजेच शनिवारपासून स्पर्धा सुरू करण्यासाठी आग्रही आहे. शनिवारी स्पर्धा सुरू झाली तर रविवारी दोन मॅच होऊ शकतात, म्हणजेच पहिल्या दोन दिवसांमध्येच तीन मॅच होऊ शकतात. Tata IPL 15th season: Starting from 26th March! 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

रविवारी स्पर्धा सुरू झाली तर हे शक्य नाही, अशी माहिती फ्रॅन्चायजीच्या एका अधिकाऱ्याने दिली. 20 फेब्रुवारीला पाठवावं लागणार शेड्यूल बोर्डाकडून सगळ्या फॅन्चायजींना 20 फेब्रुवारीपर्यंत शेड्यूल पाठवायला सांगण्यात आलं होतं, पण आता याला आणखी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने अजून आयपीएल कुठे खेळवली जाणार, याची घोषणा केलेली नाही. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे लीग राऊंडचे सामने महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे.

अहवालांनुसार मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चार शहरांत संपूर्ण आयपीएलचे सामने खेळविले जातील. तसेच मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील एकूण सहा मैदानांवर आयपीएलच्या साखळी फेरीतील सामने पार पडतील, तर प्लेऑफसह अंतिम सामना अहमदाबादच्या स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईतील सामने वानखेडे, ब्रेबॉर्न, डॉ. डी. वाय. पाटील आणि रिलायन्स जियो या स्टेडियमवर खेळविले जाऊ शकतात.

वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील आणि पुणे या चार मैदानांमध्ये आयपीएलच्या मॅच खेळवल्या जाण्याची शक्यता आहे. पण 10 टीमना सरावासाठी मैदान उपलब्ध करणं मोठं आव्हान आहे, यासाठी एमसीए तयारी करत आहे. 19 मार्च ते 7 जूनची तयारी प्रसारणकर्ता स्टार स्पोर्ट्सने कॉमेंटेटर्सना 19 मार्च ते 7 जूनपर्यंत तयार राहायला सांगण्यात आलं आहे. एवढी मोठी स्पर्धा असल्यामुळे त्यांना एक आठवडा आधी बोलावण्यात येणार आहे, तसंच स्पर्धे संपायच्या 5 दिवसांनंतरही त्यांना थांबायला सांगण्यात आलं आहे.

दरम्यान , बंगळुरूमध्ये झालेल्या आयपीएल 2022 हंगामासाठीच्या लिलावात 204 खेळाडूंवर बोली लागली आहे. तसेच त्याआधी एकूण दहा संघांनी मिळून 33 खेळाडूंना संघात कायम केले होते. यंदाच्या आयपीएल हंगामापासून आठ जुन्या संघांसह गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

You Might Also Like

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

युजवेंद्र चहल ठरला आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

टी-२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार, श्रेयससह अन्य ८ भारतीय खेळाडूंचा समावेश

सलामीवीर वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

TAGGED: #IPL #15th #season #Starting #26th #tata #March!, #आयपीएल #15वाहंगाम #26मार्चपासून #सुरू #टाटा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू
Next Article मुख्यमंत्री के. चंद्रशेखर रावांनी घेतली शरद पवारांची भेट, तब्बल दीड तास चर्चा

Latest News

समाजमाध्यमांवर पाकिस्तान झिंदाबादचा मजकुर, कोंढवा पोलिसांकडून तरुणीला अटक
महाराष्ट्र May 10, 2025
डॉ. वळसंगकर आत्महत्या : पोलिसांनी पुन्हा मागितली मनीषाची कोठडी !
सोलापूर May 10, 2025
मुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतरच सोलापूर कृउबासच्या सभापतीची निवड
सोलापूर May 10, 2025
सोलापूर विद्यापीठाकडून पंतप्रधान मोदींना निमंत्रण !
सोलापूर May 10, 2025
बोलायचं नसतं, डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते – शरद पवार
महाराष्ट्र May 10, 2025
मुख्यमंत्र्यांचे आळंदी येथे स्वागत
महाराष्ट्र May 10, 2025
राहुल गांधींचा जामीन रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्र May 10, 2025
राज्यात अकरावी प्रवेशासाठी तब्बल १६ लाखांहून अधिक जागा
महाराष्ट्र May 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?