Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘पावनखिंड’ चित्रपटाने रचला इतिहास, एकाच दिवसात दीड हजारांपेक्षा अधिक शो
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

‘पावनखिंड’ चित्रपटाने रचला इतिहास, एकाच दिवसात दीड हजारांपेक्षा अधिक शो

Surajya Digital
Last updated: 2022/02/21 at 11:13 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई : घोडखिंडीच्या इतिहासाबद्दल बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्य गाथा सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला आहे. तसेच या चित्रपटाने विक्रम रचला आहे. या चित्रपटाला महाराष्ट्रात एकाच दिवसात दीड हजारांपेक्षा अधिक शो मिळाले आहेत. दरम्यान अशी कामगिरी करणारा ‘पावनखिंड’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

पावनखिंडीचा रणसंग्रामाचा लढा आणि बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. 18 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बऱ्याच सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बाजीप्रभूंची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरात तब्बल 1500 हून अधिक शो मिळाले. एकच दिवसात इतके शो मिळवणारा ‘पावनखिंड’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच सिनेमागृहांबाहेर ‘हाऊसफुल’चे बोर्ड झळकले आहेत.

अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. शिवराज अष्टक या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरं सुवर्णपान ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या निमित्ताने उलगडलं आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून, बर्‍याच चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, नाशिकसारख्या ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. The movie ‘Pavankhind’ made history, more than one and a half thousand shows in a single day

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

‘पावनखिंड’ सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या ‘पावनखिंड’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अनेक संवाद अंगावर काटा आणतात. दिग्पालने संपूर्ण घटनाक्रम अगदी समर्पकपणे लिहिता आहे. वेळोवेळी इतिहासाचे दाखलेही दिले आहे. प्रत्येक भूमिका त्याने अतिशय बारकाईने लिहिली आहे, हे चित्रपट पाहताना वेळोवेळी जाणवते.

¤ ‘पावनखिंड’ची थोडक्यात कथा

‘पावनखिंड’ची कथा आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. बाजीप्रभू, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पडद्यावर साकारणाऱ्या या चित्रपटाची सुरूवात होते ती महाराजांच्या एका दृश्यापासून. राज्याभिषेकापूर्वी महाराज आपल्या काही मावळ्यांसह शंभूराजांना कासारी नदीकाठी घेऊन येतात आणि या पवित्र नदीला वंदन करतात. कारण याच नदीच्या पाण्यात बांदल सेनेनं रक्त सांडलं होतंं. महाराज शंभूराजांना सांगू लागतात आणि महाराजांच्या स्मृतीतून चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांसमोर उभं राहतं. पाठोपाठ बाजीप्रभू देशपांडे, त्यांच्यासोबत प्राणप्रणाने लढणारे रायाजीराव बांदल (अंकित मोहन), कोयाजीराव बांदल (अक्षय वाघमारे), बहिर्जी नाईक (हरिश दुधाडे), सरनोबत नेताजी पालकर (विक्रम गायकवाड), श्रीमंत शंभूसिंह जाधवराव (बिपीन सुर्वे), फुलाजीप्रभू देशपांडे (सुनील जाधव), हरप्या (शिवराज वायचळ), गंगाधरपंत (वैभव मांगले) आणि महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा नरवीर शिवा काशीद (अजिंक्य ननावरे) या शिलेदारांची ओळखही आपल्याला होते.

पन्हाळ्याला सिद्धी जौहरचा वेढा पडलेला असताना हा वेढा फोडण्यासाठी बहिर्जी नाईकांनी आखलेली योजना, ही योजना यशस्वी व्हावी आणि शत्रू बेसावध होऊन महाराजांना पन्हाळ्यावरुन निसटता यावे म्हणून हसतहसत मृत्यूच्या दारी जाणारे शिवा काशीद, महाराजांसाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणारे रायाजी बांदल आणि बांदल सेना, तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत पावनखिंडीत आपले प्राण रोखून धरत शत्रूशी लढणारे बाजीप्रभू देशपांडे या सर्वांच्या पराक्रमांचे जिवंत स्वरूप म्हणजेच पावनखिंड हा चित्रपट होय.

You Might Also Like

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला

परभणी : फकीरा कादंबरीच्या १०५ प्रतींचे वाटप

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नांदेड गुरुद्वारास भेट

छत्रपती संभाजीनगर-जालना-परभणी रेल्वेमार्ग अखेर दुहेरी ट्रॅकवर

TAGGED: #movie #Pavankhind #history #halfthousand #shows #singleday, #पावनखिंड #चित्रपट #रचला #इतिहास #दीडहजारांपेक्षा #शो
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर तालुका परिसरात नवजात अर्भक आढळले; रुग्णालयात दाखल
Next Article नरेंद्र मोदी पडले कार्यकर्त्याच्या पाया

Latest News

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे
महाराष्ट्र August 2, 2025
दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा
सोलापूर August 2, 2025
सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सोलापूर August 2, 2025
भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू
देश - विदेश August 2, 2025
नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड
देश - विदेश August 2, 2025
देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन
देश - विदेश August 2, 2025
रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला
महाराष्ट्र August 2, 2025
परभणी : फकीरा कादंबरीच्या १०५ प्रतींचे वाटप
महाराष्ट्र August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?