बार्शी : शहरालगत सोलापूर रस्त्यावरील पुलावर दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत सोलापूरात राहणारा सलमान सलीम हिरापुरे (वय 25 वर्ष रा. रविवार पेठ, सोलापूर सध्या रा. गोदुताई परुळेकर नवीन विडी घरकूल, सोलापूर) हा तरुण ठार झाला. याबाबत हवालदार श्रीहरी रामु घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दुचाकी चालक नितीन उर्फ नितीश गणेश कोंकत्ती (रा. सुनिल नगर, एमआयडीसी अक्कलकोट रोड, सोलापूर) याच्याविरोधात बेजबाबदाररितीने वाहन चालवून सह प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील गुळपोळी येथील महादेव भागवत पाटील 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वा. मोटारसायकलवरून सुर्डी येथे निघाले होते.
बार्शी – सोलापूर रस्त्यावर शहरालगत असलेल्या उड्डाणपूलाच्या पुढे समोरुन रॉंग साईडने आलेल्या व आरोपी नितीन कोंकत्ती चालवित असलेल्या व सलमान हिरापुरे पाठीमागे बसलेल्या स्कुटीने त्यांच्या गाडीला समोरुन जोरात धडक दिली. त्यामुळे ते तिघेही गाडीसह खाली पडले. या अपघातात ते जबर जखमी झाले. त्यातील सलमान हिरापुरे यांचा उपचार घेत असताना रुग्णालयात मृत्यू झाला. A youth from Solapur was killed in a head-on collision between two two-wheelers
□ परप्रांतीय ऑपरेटरला धामणगावमध्ये मारहाण
बार्शी : आपल्या मालकास वाचविण्यासाठी गेलेल्या परप्रांतीय जेसीबी ऑपरेटरला तालुक्यातील धामणगाव(दु.) येथे चौघाजणांनी बेदम मारहाण करुन गाव सोडण्याची धमकी दिली. याबाबत जेसीबीचे मालक रोहन संजय जाधव (रा- खुंटेवाडी सध्या रा. विराज टेलर, सासुरे फाटा, वैराग ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सागर पाटील, ऋषीकेश जगताप, श्रीनिवास दिलीपकुमार देशमुख, श्रीराम देशमुख (चौेघे रा- धामणगाव(दु.) ता. बार्शी) यांच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रोहन जाधव यांचा जेसीबीचा व्यवसाय आहे. त्यांचे काम सध्या खुंटेवाडी (ता. तुळजापुर जि उस्मानाबाद) येथे काम चालू आहे. त्यामुळे ते जीसीबी ऑपरेटर अस रईस कुरेशी (रा. मुज्जफरनगर, उत्तर प्रदेश ) याच्यासह दुचाकीवरून वैराग येथुन खुंटेवाडी येथे जात असताना मौजे धामणगाव येथे मित्र सागर पाटील याने त्यांची गाडी अडवली आणि तु मला उसने दिलले पैसे का मागतो असे म्हणुन शिवीगाळ करु लागला. त्यावेळी जीसीबी ऑपरेटर कुरेशी त्यांच्या बाजूने मध्ये पडला असता सागर पाटील, ऋषीकेश जगताप, श्रीनिवास देशमुख, श्रीराम देशमुख यांनी त्यास लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली आणि तु याच्याकडे काम करायचे नाही, तु येथुन निघुन जा नाहीतर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.
□ रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा करणार्या टपरीचालकाविरोधात गुन्हा दाखल
बार्शी : येथील बस स्थानकाभोवती रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होईल, अशा पध्दतीने टपरी लावल्याप्रकरणी टपरीचालका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस अंमलदार युनूस अबुबकर हवालदार यांनी फिर्याद दिली आहे. पोउपनि. गजानन कर्णेवाड यांचे पथक शहरात गस्त घालत असताना बस स्थानक चौक ते तुळजापूर रस्त्यावर एसटी बसेस स्थानकातून बाहेर पडून वळण्याच्या मार्गावर गुरूदत्त टुर्स अँन्ड ट्रव्हल्स असा फलक लावलेली टपरी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असा धोकादायक स्थितीत उभी असलेली दिसली.
तेथे टपरी चालक महेंद्र भगवान गायकवाड, (रा. जामगाव ता. बार्शी) हा तिकिट विक्री करत उभा होता. त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.