सोलापूर : सोलापूर दौर्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले होते त्यांचा सत्कार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केला होता त्यामुळे या दोघांवर आता स्वपक्षीयतून टीका होत आहे.
सोलापुरात जयंत पाटील यांनी महेश कोठे यांच्या घरी भेट दिली होत. त्या दरम्यान महेश कोठे यांनी या बैठकीसाठी मित्र पक्षांनाही आमंत्रण दिले होते. त्यामुळे प्रोटोकॉल असल्याचे सांगत प्रकाश वाले आणि पुरुषोत्तम बरडे यांनी जयंत पाटील यांचा कोठे यांच्या घरी जाऊन सत्कार केला होता. मात्र हा सत्कार केलेला काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आवडलेला नाही.
काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी याबाबत सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. जयंत पाटील यांचा सत्कार करायचा होता मात्र तो शासकीय विश्रामगृह किंवा अन्य ठिकाणीही करता आला असता त्यासाठी महेश कोठे यांच्या घरी जायची काय गरज होती असा सवाल काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहे दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार बरडे यांना महेश कोठे यांनी स्वतः निरोप न देता दुसऱ्या मार्फत बैठकीला येण्याचा निरोप दिल्याची माहिती आहे. त्यामुळे बरडे ही त्या ठिकाणी का गेले असे प्रश्न शिवसैनिक विचारत आहेत. Jayant Patil’s felicitation Hearing on objections on ward structure tomorrow
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
■ प्रभाग रचनेवरील हरकतीवर आज सुनावणी
सोलापूर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर एकशे आठ जणांच्या हरकती आणि सूचना प्राप्त झाले आहेत. याच्या सुनावणीसाठी संपूर्ण तयारीसह महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.
या हरकतींवरील निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.नियोजित कार्यक्रमानुसार प्राप्त सूचना व हरकतींवर उद्या शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) सोलापूर येथील नियोजन भवन येथे सुनावणी होणार आहे.
यंदाच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय व शेवटचा प्रभाग दोन सदस्यीय करताना वाढीव ११ सदस्यांसह महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३८ प्रभाग करण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व विविध नियमांसह शहरातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, रेल्वेलाईन, मुख्य रस्ते, वस्त्या व नगरे यांचा विचार करत महापालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली.
आयोगाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर ती प्रारुप निर्देशही प्राप्त झाले आहेत. प्रभाग रचना आणि आराखडा १ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना देण्यात आल्या.
यादरम्यान तब्बल १०८ जणांच्या हरकती व सूचना निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या.
सर्वाधिक २७ हरकती प्रारूप रचनेतील प्रभाग क्रमांक १५ व २० साठी प्राप्त झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक २३ साठी १० हरकती आले आहेत. या सर्व तक्रारी आणि सूचना या वेगवेगळ्या करून सविस्तर माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून मच्छिद्र प्रतापसिंह यांची नियुक्ती करण्यात आली. सुनावणीपूर्वी हरकतींवर अभ्यास करून त्या-त्या प्रारूप रचनेतील प्रभागांची पाहणी व ठिकाणांची पाहणी ते करणार आहेत.
सुनावणीच्या अनुषंगाने नकाशे, भाग परिसराची संपूर्ण माहिती सज्ज ठेवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात ग्रीन सिग्नल मिळाले आहे. हरकतदार व सूचना सादर करणाऱ्या अर्जदारांना प्रभागनिहाय व वेळेनुसार टप्याटप्याने उपस्थित राहण्यास संदर्भात कळविण्यात येणार आहे.