Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पालकमंत्री आक्रमक : आता बघतोच… कॉन्ट्रॅक्टर कसा काम करत नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पालकमंत्री आक्रमक : आता बघतोच… कॉन्ट्रॅक्टर कसा काम करत नाही

Surajya Digital
Last updated: 2022/02/26 at 10:57 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

● प्रा. सुरवसे यांनी मांडलेल्या प्रश्नावर पालकमंत्री आक्रमक…

अक्कलकोट – आता बघतोच.. कॉन्ट्रॅक्टर कसा काम करत नाही ते…मी स्वतः नारळ फोडेन…काम करून घेईन असे आक्रमक होत प्रा. सुरवसे यांनी मांडलेल्या प्रश्नावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील अक्कलकोट दौऱ्यावर होते. या संवाद कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे यांनी अक्कलकोट तालुक्यातील खराब रस्त्यांची कैफियत मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पात बोरगाव परिसरातील रस्त्यांसाठी साडेपाच कोटीचा निधी मंजूर केला होता. त्यानंतरच्या दोन वर्षात टेंडर प्रक्रिया पार पडली आणि जून 2021 मध्ये कार्यारंभ आदेश झाला. पण अद्याप संबंधित दोन्ही ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत.

या परिसरातील रस्त्यांची चाळण झाली असून विद्यार्थी, रुग्ण, अबालवृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. ही कामे वेळेत पूर्ण का होत नाहीत ? ठेकेदारांवर कुणाचा अंकुश नाही का ? ठेकेदार कुणाचे ऐकून काम बंद ठेवत आहेत ? आणि जनतेला वेठीस धरत आहेत ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले.

“Now you see … how the contractor is not working … I will break the coconut myself …”

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यावर बोलताना जयंत पाटील यांनी पालकमंत्री महोदयांनी या बाबीची गंभीरपणे दखल घ्यावी अशी सूचना केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे याविषयी बोलताना भलतेच आक्रमक झाले. जिल्हा सरचिटणीस प्रा. सुरवसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून अजितदादांनी मंजूर केलेल्या रस्त्यांची कामे वेळेत होत नसतील तर ते ठेकेदार आहेत, ते बघतोच कसे काम करत नाहीत ते ! मी स्वतः नारळ फोडायला येईन.  समोर थांबून काम करायला लावेन.. जनतेच्या सोयीसुविधांसाठी दिलेला निधी वेळेवर खर्च करून लोकांची कामे होत नसतील तर अशा ठेकेदारांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला.

यावेळी महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उमेश पाटील, तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, शहराध्यक्ष मनोज निकम, सरचिटणीस शंकर व्हनमाने, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, युवक शहर अध्यक्ष आकाश कलशेट्टी उपस्थित होते.

जयंत पाटील, पालकमंत्री यांनी सदर ठेकेदारांच्या वेळकाढूपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीने कामास सुरुवात करावी, असे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात पालकमंत्री यांच्या हस्ते, राष्ट्रवादीच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर दोन्ही रस्त्यांचे भूमिपूजन तसेच बोरगाव आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन होणार असल्याचे प्रा. प्रकाश सुरवसे, (जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी) यांनी सांगितले.

 

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Now #yousee #contractor #working #break #coconut, #कॉन्ट्रॅक्टर #काम #नारळ #फोडणार #अक्कलकोट #पालकमंत्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भीमा साखर कारखान्यात मोलॅसिस टाकी फुटून दुर्घटना; एक ठार तर तिघे जखमी
Next Article रशिया- युक्रेन युद्ध सुरूच, राजधानीत रात्री भयंकर स्फोट

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?