सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे तर मनोहर सपाटे हे राष्ट्रवादीचे. मात्र विजयकुमार देशमुख यांनी मनोहर सपाटेंचा हात चक्क डोक्यावर घेतला, मात्र सपाटे यांनी सावध पवित्रा घेत मागे हा घेत मागे सरकले. हा प्रकार नियोजन भवना समोर घडला.
नियोजन भवन येथे शुक्रवारी (ता.२५) प्रारूप प्रभाग रचना हरकती सुनावणी निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकाऱ्यांसमोर घेण्यात आली. यावेळी सोलापूर शहरातील विविध प्रभागावर स्वतः आमदार विजयकुमार देशमुख यांनी हरकत घेतली होती. निवडणूक आयोगासमोर हरकत येऊन आल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, आतापर्यंत ८ निवडणुका झाल्या वॉर्ड रचना जाहीर होतात, हरकती घेतल्या जातात, एकही गल्ली-बोळ बदलले गेले नाहीत, आहे तशाच निवडणुका झाल्या. त्यामुळे हरकतींवर सुनावणी घेणे हा फार्स वाटत आहे. काही प्रभागांमध्ये २७ हजार लोकसंख्या असताना काही प्रभागात २१ हजार लोकसंख्या आहे हे कसे होऊ शकते? दोन्ही प्रभाग शेजारी आहेत, हे कशामुळे झाले. काही प्रभाग एका भिती वरून वेगळे झाले आहेत. Deshmukh took Sapate’s hand on his head, but Sapate slipped back
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
निवडणूक आयोगाच्या नियमांचे पावमी झाल्याचे यावेळेस पहावयास मिळाले. राजकीय दबावाखाली ही प्रभार रचना जाहीर झाल्याचे दिसून येते असे देशमुख म्हणाले. यावेळी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, शिवानंद पाटील उपस्थित होते.
विजयकुमार देशमुख म्हणाले, आम्ही तक्रारी तर केल्या आहेत. आजवरचा अनुभव पाहता प्रभाग रचनेत बदल होणार नाही. ही रचना राजकीय प्रभावाखाली केली आहे. निवडणुकीपूर्वी महापालिका आयुक्तांची बदली करणे आवश्यक आहे. अन्यथा असाच गोंधळ होणार आहे. यादरम्यान, देशमुखांच्या बाजूने मनोहर सपाटे जात होते. देशमुख सपाटे यांच्याजवळ गेले. महापालिका, आमदारकीला सपाटे यांच्याकडून अनेकदा मदत झाली. सपाटेंचा आशीर्वाद माझ्या मागे आहे. यापुढेही राहणार आहे. सपाटे माझ्यापेक्षा मोठे आहेत असे म्हणत देशमुखांनी सपाटेंचा हात ओढून आपल्या डोक्यावर ठेवला. सपाटे हात झटकत मागे सरकले.
मात्र यावेळी दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले. यापूर्वी सपाटेंनी आपल्याला मदत केली होती, आताही आम्हाला त्यांची मदत राहणार आहे. सपाटे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मला आशीर्वाद आहे, असे यावेळी आमदार देशमुख आवर्जून म्हणाले.