● राज्य सरकारने उगाच समाजाची दिशाभूल करू नये
मुंबई : खासदार संभाजीराजे भोसले हे मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. पण 2 दिवसांपूर्वी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, एक मागासवर्गीय आयोग असताना मराठा समाजासाठी वैयक्तिक मागासवर्गीय आयोग स्थापन करता येतो का? असा प्रश्न संभाजीराजे यांनी केला आहे.
आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या देखील उपोषणस्थळी सहभागी झाल्या आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषण करावे लागत असल्याचे संभाजीराजे म्हणाले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह प्रसाद लाड यांनी घेतली संभाजीराजेंची भेट घेतली. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी घेतली संभाजीराजेंची भेट घेतली. दरम्यान, आज आमरण उपोषणाला मी एकटाच बसणार आहे. मराठा समाजाला वेठीस धरु नये, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
यावर मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारच्या या नवीन मागासवर्ग आयोगाला विरोध केला. एक मागासवर्गीय आयोग असताना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात, घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाची दिशाभूल करू नये, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला ठणकावले आहे. Is it possible to set up another commission while there is a backward class commission? : Sambhaji Raje Maratha Reservation
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोलापुरातील लाक्षणिक उपोषण आंदोलनासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
संभाजीराजे म्हणाले, मी 2007 पासून महाराष्ट्रात फिरत आहे. मराठा आरक्षण का महत्वाचं आहे याची जाणीवजागृती केली पाहिजे असे संभाजीराजे यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाला सोबत घेऊन गेले नाहीत तस सर्व समाजाच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन पुढे गेले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषण करावे लागत असल्याचे संभाजीराजे म्हणाले. आरक्षण मिळेपर्यंत गरिब मराठा समाजाने काय करायचे? असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला. आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. आमरण उपोषण करणे कठीण काम आहे. परंतू, 2007 पासून हा मुद्दा मी पुढे नेत आहे, आत्ता जर काही केले नाही तर काय उपयोग, म्हणून मी उपोषण करत असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
15 दिवसांत आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. त्यानंतर आम्ही नाशिके मुक आंदोलन थांबवले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला 400 कोटींची घोषणा केली. मात्र, थोडेच पैसे आले. जेवढा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे, तेवढाच सारथीचा विषय महत्त्वाचा आहे. यात अनेक ठिकाणी केंद्र सुरु केली. मात्र, तेथील अडचणी सोडवल्या नाहीत असे संभाजीराजे म्हणाले.
ठाण्यात फक्त वसतीगृह सुरु झाली, तिही पालाकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने झाले. तुम्ही काय केलं? असा सवाल यावेळी संभाजीराजे यावेळी म्हणाले. ज्याच्यामुळे एवढे मोर्चे निघाले त्या कोपर्डीचे काय झालं? असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले. मी महाराष्ट्र पिंजून काढत असताना सर्वजण म्हणाले की, तुम्ही हे नेतृत्व केलं पाहिजे. 2013 मध्ये मी लाखोंच्या संख्येने आंदोलन केल्याचे सांगितले.
समाजाला वेठीस धरू नये म्हणून मी एकट्याने आंदोलन करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 10 दिवसात महाराष्ट्रातील वातावरण बदलले. मला पाठिंबा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना पाठिंबा आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. मी अठरा पगड जात,12 बलुतेदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब मराठ्यांसाठी माझा लढा असल्याचे सांगितले.