● अखेर शेतकरी लढ्याला यश,१ मार्च बिल भरण्याची मुदत
भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे महावितरण कार्यालयास शेतकर-यांनी टाळे ठोकले. या आंदोलनामुळे थोडा दिलासा मिळाला. १ मार्चपर्यंत विजबिल भरण्याची मुदत वाढवून मिळाली आहे.
भीमा नदीकाठी असलेल्या भंडारकवठे, बाळगी, सादेपूर व लंवगी येथे गेल्या तीन दिवसापासून अचानकपणे शेतीचा वीज पुरवठा बंद केल्याने शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. २६) सकाळी भंडारकवठे वीज वितरण मंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकुन आपला संताप व्यक्त केला.
स्थानिक नेते प्रथमेश पाटील व सादेपूरचे उपसरपंच आप्पासाहेब चितापुरे म्हणाले तीन दिवसापूर्वी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याना कोणतेही पूर्व सूचना न देता शेती पंपाचे वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे पाण्याअभावी हाता तोंडाशी आलेली द्राक्षे, ऊस, कांदा, सुर्यफूल, गहू आदी पिके पाण्याविना करपून जात असून यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सध्या ऊस बील मिळाले नसल्याने लगेच वीज बील भरणे शक्य नाही, शेतकऱ्यांना दोन महिने मुदत देणे गरजेचे आहे. अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. Bhandarkavathe MSEDCL office was avoided by the farmers
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
यावेळी महावितरण विभागाचे अधिकारी उपकार्यकारी अभियंता संदिप पाटील, मोहन आलाट, सहायक अभियंता अजय चव्हाण, आलम शेख, भंधारकवठे विभाग कनिष्ठ अभियंता राजेंद्र निकम , महावितरण विभागचे कर्मचारी उपस्थित होते.
किरण पाटील, महादेव पाटील, कुंशात पाटील, सरपंच संगप्पा कोळी, कांतेश बिज्जरगी, गंगाधर कोळी, अनिल बिडवे, सादेपूरचे पिंटू व्हनमाने, चंद्रकांत बुगडे, शिवानंद बुगडे, सिध्देश्वर बहिरगोंडे, आमसिद्ध कुबसंगे, श्रीमंत कोळी, अंबण्णा लांबतूरे, हरसिंग भोई, आप्पाशा हळ्ळी, लवंगीचे मल्लिकार्जुन कोळी, युवराज कोकरे, चंद्रकांत नंदरगी आदी शेतकरी उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीकाठी असलेल्या बाळगी, सादेपूर, लवंगी, भंडारवठे गावांतील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन वीजबिल न भरल्यामुळे वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशाने वीजतोड करण्यात आली. संबंधित शेतकरी आंदोलन केले असता शेतकऱ्यांना १ मार्च पर्यंत विजबिल भरुन महावितरणास सहकार्य करावे, असे सांगून विजपुरवठा सुरळीत चालू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदाेलन माघार घेतल्याचे राजेंद्र निकम (कनिष्ठ अभियंता, भंडारकवठे) यांनी सांगितले.