सोलापूर – सशस्त्र दरोडेखोरांनी एका शिक्षिकेच्या आतून बंद असलेल्या घराचा दरवाजा उचकटून लाकडी दांडक्याने मारहाण करीत रोख रकमेसह ५ लाखाचे दागिने लुटून नेले. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास मंगळवेढा येथील दामाजी नगरात घडली.या धाडसी प्रकारामुळे मंगळवेढा परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
दामाजी नगर (मंगळवेढा) येथील डोके हॉस्पिटलच्या पाठीमागे चंगेजखान इनामदार हे राहण्यास आहेत. त्यांची पत्नी नर्गिस या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास इनामदार दांपत्य आणि त्यांची मुले जेवण आटोपून घरात झोपले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास चौघां दरोडेखोरांनी त्यांच्या घरा पाठीमागच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला.
लाकडी दांडक्याने इनामदार दांपत्यास बेदम मारहाण करीत दागिने आणि पैशाची मागणी केली. त्यानंतर कपाटातील १७६ ग्रॅम सोन्याचे दागिने,५० हजार रुपये रोख, घड्याळ आणि चांदीच्या वस्तू असा एकूण ५ लाख ५ हजाराचा ऐवज लुटून पोबारा केला.
या घटनेची फिर्याद नर्गिस इनामदार (वय ३९ रा. दामाजी नगर मंगळवेढा) यांनी मंगळवेढा पोलिसात दाखल केली.पोलिसांनी अनोळखी चौघा अनोळखी इसमाविरुध विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक निरीक्षक पिंगळे पुढील तपास करीत आहेत.
□ बांधकामावरील ७० हजाराचे लोखंड पळवले
जवळा (ता.सांगोला) येथे राहणार्या रणजीत नारायण देशमुख यांच्या नवीन बांधकामावरील १ हजार १०० किलो वजनाचे लोखंडी सळई चोरट्यांनी पळविली. ही चोरी शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या चोरीची फिर्याद देशमुख यांनी सांगोला पोलिसात दाखल केली. चोरीस गेलेली लोखंडी सळई७० हजार किमतीची होती. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार निंबाळकर पुढील तपास करीत आहेत. Armed robbery at teacher’s house on Tuesday; One died after a bag got stuck in the wheel of a two-wheeler
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ गर्भवती विवाहितेची विष पिऊन आत्महत्या, दुचाकीच्या चाकात पिशवी अडकून एकाचा मृत्यू
सोलापूर – एका १८ वर्षीय गर्भवती विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना देगाव (ता.मोहोळ) येथे घडली.
राधिका प्रेम काळे (वय १८ रा.देगाव) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास तिने देगाव येथील राहत्या घरात विष प्राशन केली होती. तिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी तिने मृत कन्या रत्नाला जन्म दिला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास राधिका काळे हीदेखील उपचारादरम्यान मयत झाली. या घटनेची प्राथमिक तालुका पोलिसात झाली असून प्राथमिक तपास हवालदार नाईकवाडी करीत आहेत.
■ दुचाकीच्या चाकात पिशवी अडकून एकाचा मृत्यू; दुसरा जखमी
सोलापूर – दुचाकीवरून प्रवास करताना पिशवी चाकात अडकून दुचाकी घसरल्याने चालक ठार तर दुसरा जखमी झाला. हा अपघात अरण (ता.माढा) येथे आज शनिवारी दुपारच्या सुमारास घडला.
युन्नूस गनी तांबोळी (वय ४५ रा.काजीगल्ली, अकलूज ता.माळशिरस) असे मयताचे नाव आहे. त्यांच्या साथीदार सलीम अजीम तांबोळी (वय ४५) हे जखमी झाले आहे. ते दोघे आज दुपारी चार वाजेच्या सुमारास टेंभुर्णी ते सोलापूरच्या दिशेने निघाले होते. अरण गावाजवळ हा अपघात घडला. जखमींना वरवडे टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी युन्नूस तांबोळी हे उपचारापूर्वीच मयत झाले. या अपघाताची नोंद तालुका पोलीसात झाली. हवालदार गावित हे प्राथमिक तपास करीत आहेत .