नवी दिल्ली : एका केंद्रीय मंत्र्याने ‘भाभाजी पापड खा, कोरोनामुक्त व्हा’ असा संदेश देवून सामान्यांची दिशाभूल करणारा दावा केल्यामुळं त्यांच्यावर सोशल मीडियावरून खूप टीका झाली होती. आता तेच मंत्री स्वतः अर्जुन राम मेघवाल कोरोनाग्रस्त झाले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी भाभीजी पापड खा आणि कोरोना मुक्त व्हा, असा अजब सल्ला देऊन केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल चर्चेत आले होते. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळं ते ट्रोलही झाले होते. आता तेच स्वतः अर्जुन राम मेघवाल यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं जाहीर केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनानं जगभरात अक्षरशः थैमान घातलंय. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर कायमस्वरूपी लस शोधण्याचा प्रयत्न करत असून, दिवस रात्र एक करत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ असा प्रयत्न करत असताना, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कोरोना रोखण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला देऊन नवा वाद ओढवून घेतला होता. भाभीजी पापड खाल्ल्यानंतर कोरोनाशी लढण्यासाठीची ताकद (अँटिबॉडिज्) तयार होईल, असा दावा अर्जुन मेघवाल यांनी केला होता.