नवी दिल्ली : केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणातील पीडितांसाठी नुकसान भरपाईची रक्कम वाढवली आहे. 1 एप्रिलपासून संपूर्ण देशात नवीन आदेश लागू होणार आहे. त्यानुसार हिट अँड रन अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई 50 हजार रुपये दिली जाणार आहे. आधी ही रक्कम 12,500 रुपये होती. तर मृत्यू झाल्यास संबंधितांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार. आधी 25 हजार रुपये मिळत होते.
मंत्रालयाने गंभीररीत्या जखमी झालेल्यांसाठी आता साडेबारा हजार रुपयांची नुकसानभरपाई वाढवून 50 हजार रुपये करण्यासाठी आणि अशा अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या निकटवर्तीयांना 25 हजारांऐवजी 2 लाख रुपये इतकी वाढीव नुकसानभरपाई देण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.
नुकसानभरपाई मिळविण्यासाठीची अर्ज प्रक्रिया आणि पीडितांना प्रत्यक्ष भरपाई मिळणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी कालमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. आता 1 एप्रिल 2022 पासून जुन्या भरपाई योजना 1989 ऐवजी ही नवी योजना लागू होणार आहे. The amount of hit and run compensation increased to 2 lakhs, the compensation increased 8 times
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मंत्रालयाने मोटार वाहनांच्या अपघात निधीची उभारणी , परिचालन, निधीचे स्रोत इत्यादींसाठी देखील 25 फेब्रुवारी रोजी काही नियम जाहीर केले. हा निधी हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी, जखमींच्या उपचारासाठी आणि केंद्र सरकारने विहित केलेल्या इतर तत्सम कारणांसाठी वापरला जाईल.
25 फेब्रुवारीला रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी करून केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये संशोधन करून रिजिड व्हीकल आणि ट्रेलरमध्ये टू व्हीलरसाठी जास्तीत जास्त तीन डेकची परवानगी दिली आहे.
गंभीर जखमींसाठी भरपाईची रक्कम वाढवून 50,000 रुपये करण्यात आली आहे, तर मृत्यूच्या बाबतीत सध्याच्या 25,000 रुपयांवरून 2,00,000 लाख रुपये अशी भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की, “ही योजना 1 एप्रिल 2022 पासून लागू होणारी भरपाई योजना, 1989 ची जागा घेईल.” तसेच, प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नुकसान भरपाईसाठी अर्ज करणे आणि पीडितांना मोबदला जाहीर करणे या प्रक्रियेसाठीही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.