● राज्यपालांचा निषेध म्हणून आमदारानं केलं खाली डोकं वर पाय
● राज्यपालांचं सभागृहातून निघून जाणं लाज वाटणारी गोष्ट – आदित्य ठाकरे
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी मोठा गदारोळ झाला. त्यामुळे राज्यपाल भाषण अर्धवट सोडून निघून गेले. पहिल्याच दिवशी विधीमंडळातील या नाट्याने सर्वांना धक्का बसला. विरोधक नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर सत्ताधारी पक्षातील आमदार राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यपालांचा विधानभवनाच्या बाहेर निषेध करण्यात आला. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी निषेध नोंदवला. आमदारांनी यावेळी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी हात वर करुन घोषणा थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर मग ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या. आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन, अर्थात खाली डोकं वर पाय करत राज्यपालांचा आणि विरोधी पक्षाचा निषेध केला.
Mutiny! For the first time in history, the governor dropped out of the speech; Announcement of ‘Removal of Governor, Defend Maharashtra’
आज राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. सभागृहातील अभिभाषणाच्या गोंधळानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाषण अर्ध्यावर सोडून सभागृहातून बाहेर पडले. यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांचं असं निघून जाणं हे लाज वाटणारी गोष्ट आहे. यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला आहे, असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.
राज्यपालांच्या या भाषणावेळीच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग ‘नवाब मलिक हाय हाय’च्या घोषणा दिल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधात सत्ताधारी पक्ष विधीमंडळात आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
पायऱ्यांवर सत्ताधा-यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
काय ते हातवारे, काय ते हसणं.सारचं किळसवाणं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव!, असं ट्विट करत काँग्रेसने राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.
या प्रकरणावर काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले की, शिवरायांचा उल्लेख एकेरी केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. अशा पद्धतीची भूमिका घेऊन तसा कायदेशीर प्रस्तावही आणला जाणार आहे. या प्रकारे छत्रपतींचा अपमान आणि फुले दांपत्याबाबतचे आक्षेपार्ह वर्तन राज्यपालांना शोभेसं नाही. त्याबाबत भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट करावी.
काय ते हातवारे, काय ते हसणं…
सारचं किळसवाणं.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते.
कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव! pic.twitter.com/fyuF9uVUdn
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 2, 2022
पुण्यात १४ फेब्रुवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं लग्न १० व्या वर्षी झालं होतं. तेव्हा त्यांच्या पतीचं वय १३ वर्ष होतं. त्यामुळे कल्पना करा की, इतक्या लहान वयात एक मुलगा आणि मुलगी लग्नानंतर काय विचार करत असतील?, एका प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे. तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं.
त्याच संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेक लोकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुलेंच्या वक्तव्यानंतर त्यांनी औरंगाबादमध्ये २७ फेब्रुवारी रोजी श्री समर्थ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यपालांनी माफी मागावी, अशा प्रकारची मागणी सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे.