● पण ईडीने न्यायालयात त्यांची ही केली मान्य
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची कोठडी संपत असून त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी कोर्टाने नवाब मलिक यांना पुन्हा दणका दिला. कारण नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला आहे. न्यायालयानं त्यांच्या कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ केली आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी मंत्री नवाब मलिकांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. ईडीने आठ तासाच्या चौकशीनंतर मलिकांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ईडी कोठडी सुनावणी होती. आता त्यात आणखीन वाढ झाली आहे. आज न्यायालयानं त्यांच्या कोठडीत सात मार्चपर्यंत वाढ केली आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे मलिक यांची चौकशी अपूर्ण राहिली होती, असं सांगत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मालिकांची कोठडी वाढवावी अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालायने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांच्या कोठडीत वाढ केली.
या तीन दिवसात चौकशी होऊ शकली नाही. त्याच बरोबर तपासातून जी नवीन माहिती पुढे आली आहे, त्यात काही साक्षीदारांनी सांगितलं की, नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध होते, असा युक्तिवाद करत ईडीने न्यायालयात मलिक यांच्या कोठडीत वाढ करण्यात मागणी केली होती. या युक्तिवादानंतर चौकशीचे जे तीन दिवस वाया गेले होते, त्यासाठी नवाब मलिक यांच्या कोठडीत न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली. A big blow to Nawab Malik; Bail rejected, ED remanded in custody
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नवाब मलिकांनी 55 लाख हसीन पारकरला दिल्याचे ईडीने म्हटले होते. पण, आता ईडीने न्यायालयात त्यांची चूक मान्य केली असून मलिकांनी 5 लाख दिल्याचे म्हटलं आहे. आमच्या टायपिंगमध्ये चूक झाल्याचं ईडीने म्हटले, असं एएसजी अनिल सिंह म्हणाले. 25 ते 28 मलिक वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात होते. त्यामुळे नवाब मलिकांची कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तीवाद सिंह यांनी केला. त्यानुसार न्यायालयानं मलिकांच्या कोठडीत वाढ केली आहे. वकील देसाई यांनी मलिकांची बाजू मांडली. ईडी कार्यालयात घडत असलेल्या घडामोडी माध्यमांपर्यंत कशा पोहोचतात? असा सवाल उपस्थित केला. महाराष्ट्रातील मंत्र्यांना तुरुंगात जावं लागत. तर ही राजकीय हेतूने करण्यात आलेली कारवाई असल्याचा युक्तिवाद देसाई यांनी न्यायालयात केला. ॲड. देसाई यांनी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
नवाब मलिकांनी दाऊदशी संबंधित माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर ईडीने अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मलिकांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. ईडीने मलिकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ईडीने मलिकांनी अटक केली.
नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीतील नेत्यांनी आंदोलन केलं. तसेच मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी भाजपने लावून धरली. त्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले.