सोलापूर – शेळगी परिसरातील बसवेश्वर नगरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल बुधवारी (ता. २) रात्रीच्या सुमारास घडली.
उजमा शफिक शेख (वय २७ रा.बसवेश्वर नगर, शेळगी) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. काल रात्री ८ वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना तिने छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतली होती. तिला फासातून सोडवून नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मयत झाली. या घटनेची नोंद जोडभावीपेठ पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार बुगड पुढील तपास करीत आहेत .
□ नांदणी येथे तलवारीने हल्ला तरुण जखमी
सोलापूर – पूर्वीच्या भांडणातून तलवार, लोखंडी रॉड, काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत तरुण जखमी झाला. ही घटना नांदणी (ता.दक्षिण सोलापूर) येथे आज गुरुवारी (ता.३ ) दुपारच्या सुमारास घडली.
राजू बाबू जाधव (वय ३० रा.बसवनगर मंद्रूप) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला मंद्रूप येथे प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास नांदणी येथील शेतात काम करीत होता. त्यावेळी शिवानंद बंडे, गणेश डोंमनाळे, श्रीशैल सुरवसे, लक्ष्मण डोंमनाळे यांच्यासह १० ते १२ जणांनी त्याला मारहाण केली, अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे. Solapur: A young woman commits suicide by strangling a goat song, Nandini is attacked with a sword
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ अकोले येथे कोयत्याने मारहाण, पती-पत्नी जखमी
अकोले (ता.माढा) येथे शेतातील वाटेच्या वादातून कोयता आणि दगडाने केलेल्या मारहाणीत संतोष अशोक काळे (वय ४४) आणि त्यांची पत्नी रोहिणी काळे (वय ३८ रा.अकोले) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल बुधवारी (ता. २) सकाळी त्यांना शिवाजी काळे आणि अन्य तीन जणांनी मारहाण केलेली अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
□ साखर पेठेत आत्महत्येचा प्रयत्न
शहरातील साखर पेठेत राहणाऱ्या विनोद मधुकर कनकट्टी (वय २३) या विवाहित तरुणाने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज गुरुवारी (ता.३) सकाळच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी कृष्णाबाई शंकुर (सासू) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. कर्ज झाल्याने त्याने हा प्रकार केला अशी प्राथमिक नोंद जेल रोड पोलिसात झाली आहे .
□ रेल्वे स्थानकाजवळ रॉडने मारहाण
रेल्वे स्थानक परिसरातील काडादी चाळीजवळ मोटारसायकलीच्या वादातून लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत नूरअहमद कादर सय्यद (वय ४८ रा. न्यू धोंडीबावस्ती, रामवाडी) हे जखमी झाले. ही घटना आज गुरुवारी (ता. ३) दुपारच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जक्की शेख याने मारहाण केली, अशी नोंद सदर बाजार पोलिसात झाली आहे.