Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुणे – पेइंग गेस्ट तरुणींने घातले तोकडे कपडे, तरुणींना झाली चपलेने मारहाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

पुणे – पेइंग गेस्ट तरुणींने घातले तोकडे कपडे, तरुणींना झाली चपलेने मारहाण

Surajya Digital
Last updated: 2022/03/05 at 7:49 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

पुणे : शॉर्ट कपडे घातले म्हणून पुण्यात काही तरुणींना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या तरूणी पीजी म्हणून राहत होत्या. वाचा सविस्तर काय झाले. मात्र या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली आहे.

पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनीयर असलेल्या तीन तरुणींना चपलेने मारहाण करण्यात आली आहे. परिसरात शॉर्ट घालून फिरत असल्याने त्यांना महिलेने मारहाण केली आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणींच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी घरमालकीणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तोकडे कपडे घालण्यावरून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. Pune – Paying guest young women wore tight clothes, young women were beaten with slippers

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झालीय. पोलिसांनी मारहाणीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक नगर परिसरात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ह्या खराडी येथील रक्षक नगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहतात.

त्या वेगवेगळ्या कंपनीत काम करतात. संबंधित तरुणी राहत्या परिसरात शॉर्ट कपडे घालून फिरतात, या कारणातून आरोपींनी त्यांना चप्पलनं मारहाण केली आहे. याबाबत घरमालकीणीनं चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

तक्रारदार महिलेनं सांगितलं की, ‘संबंधित आरोपी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करतात. यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या कपड्यांवरून वाद उकरून काढला आहे. बुधवारी रात्री काही आरोपी त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणी शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात, असा आरोप करून भांडणाला सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींना चप्पलने मारहाण केली आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #Pune #Payingguest #youngwomen #tightclothes #beaten #slippers, #पुणे #पेइंगगेस्ट #तरुणी #तोकडेकपडे #चपलेने #मारहाण #चंदननगर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चालत्या एसटीवर उसाचा ट्रेलर कोसळला, अनर्थ टळला पण तीन तास ट्राफिक जाम
Next Article सोलापुरात ऊसतोड मजुरांच्या तीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?