● राज्यपालांवर शरद पवारांची टीका
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाच राज्यात कुणाची सत्ता येईल असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी काही माझी वाईट अवस्था झाली नाही. मी काही ज्योतिषाचं काम घेतलं नाही. बघूया काय होतं ते, असं ते म्हणाले. नवाब मलिक यांना राजकीय हेतूनेच अटक करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. ‘महाराष्ट्राला अनेक कर्तृत्ववान राज्यपालांचा वारसा आहे. त्यात आजच्या राज्यपालांबाबत भाष्य न केलेलंच बरं’, असं पवार म्हणाले. तसेच केंद्र सरकारच्या कामाची पातळी घसरतेय ते कुठपर्यंत घसरत गेलेत याची अनेक उदाहरणं आहेत. त्याची ही कामगिरी महाराष्ट्रातही पहायला मिळत आहे,’ असंही ते म्हणाले. पुण्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना ज्योतिषाचं काम घ्यावं, इतकी माझी वाईट अवस्था झाली नाही. मी काही ज्योतिषाचं काम घेतलं नाही, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. उत्तर प्रदेशात 7 मार्चला शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. 10 मार्चला निकाली येणार आहेत. यावर भाष्य करणं शरद पवारांनी टाळलं आहे.
राज्यपाल अभिभाषणाच्या निमित्ताने झालेल्या गोंधळामुळे राज्यपालांनी भाषण सोडून गेले. राज्यपालांच्या वागणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांना प्रश्न करण्यात आला. यावर शरद पवारांनी बोलणे टाळले. पण त्यांनी आपल्या वक्तव्यातून सूचक इशाराच दिला आहे. I am not in a bad condition to do astrology work, Sharad Pawar’s Tola
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यावेळी आपल्या काळात राज्यपाल पदाला असलेली प्रतिष्ठा आणि कर्तृत्ववान राज्यपालांचा पाढा त्यांनी यावेळी वाचला. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी राज्यपाल यासारख्या घटनात्मक पदासाठीच्या नेमणुकांच्या निमित्ताने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही आवाहन केले आहे.
राज्यकर्ता म्हणून काम करत असल्यापासून अनेक चांगले आणि कर्तृत्ववान राज्यपालांचे काम पाहता आले. त्यामध्ये राज्यकर्ता पीसी अलेक्झांडर यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपालही आम्ही पाहिले. पण हल्लीचे राज्यपाल आहेत त्यांच्यावर भाष्य न केलेले बरे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या प्रश्नाला उत्तर दिले.
राज्यपाल यासारख्या घटनात्मक पदावर कोणत्या व्यक्तीला नेमावे हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. आता १२ आमदारांच्या नेमणुकांबाबत एक वर्ष होऊन गेले, तरीही आमदारांच्या नेमणुका केल्या जात नाही. जर राज्यपालांसारखी व्यक्ती निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून पदाची ती प्रतिष्ठा ठेवणार नसतील, तर राष्ट्रपती, पंतप्रधानांनी यासारख्या पदाचा विचार करावा, असेही शरद पवार म्हणाले.
युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या मुद्द्यावर शरद पवारांनी मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले. पुण्यातील मेट्रोच्या अर्धवट कामांच्या उद्घाटन करण्यापेक्षा युक्रेनवरून विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पुणे मेट्रोचे उद्घाटन हे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या हस्ते पुण्यात नदी सुधार प्रकल्पाला सुरुवात होणार आहे.