Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तरुण शेतक-याची आत्महत्या; आमदार आवताडे, परिचारकांकडून एक लाखाची मदत 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

तरुण शेतक-याची आत्महत्या; आमदार आवताडे, परिचारकांकडून एक लाखाची मदत 

Surajya Digital
Last updated: 2022/03/05 at 10:30 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

● चालू अधिवेशनामध्ये आवाज उठवू – फडणवीस

पंढरपूर : मगरवाडी येथील कर्जाला कंटाळून  सुरज जाधव या तरुण शेतक-याने व्हिडीओ करीत आत्महत्या केली.  मृत शेतक-याच्या कुटुंबियाची आमदार समाधान आवताडे व  आमदार प्रशांत परिचारक यांनी सांत्वनपर भेट घेऊन त्यांना एक लाख रुपये आर्थिक साहाय्य मदत केलीय.

यावेळी आमदार आवताडे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोन वरून मयत सूरज जाधव यांचे वडिलांशी चर्चा घडवून आणली. यावेळी सरकारला धारेवर धरत चालू अधिवेशनामध्ये आवाज उठवून नक्कीच  न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

भारतासारख्या कृषीप्रधान देशात परत शेतकऱ्याच्या जन्माला येणार नाही अशी भावनिक साद घालत अखेरचा श्वास घेणाऱ्या या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने शेतकरी जातीला खूप मोठी संवेदना आणि ठेच पोहचवली आहे.

सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या तोंडाला नेहमीच आश्वासनांची पाने पुसणाऱ्या या सरकारच्या धोरणात्मक बाबींचा दोन्ही आमदारांनी तीव्र शब्दात निषेध करून करून मयत सुरज जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दिलीप घाडगे, दिलीप चव्हाण, माऊली हळणकर, भास्कर कसगावडे, सुभाष मस्के, विनोदराज लटके, शरद चव्हाण, अविनाश मोरे, बालम मुलाणी, मगरवाडी परिसरातील  ग्रामस्थ उपस्थित होते. Young farmer’s suicide; MLA Avtade, one lakh help from parichark

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ अशी केली तरूण शेतक-याने आत्महत्या

सोलापूर / पंढरपूर : वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी ठरला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही असे म्हणून मगरवाडी (ता. पंढरपूर) येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली होती. उपचारादरम्यान काल शुक्रवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सूरजला पंढरपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला. मगरवाडी येथे सूरज जाधव याची शेती आहे. मात्र, शेतीत म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते. शेती करत असताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सूरज हताश झाला होता. त्यातूनच टोकाचे पाऊल उचलत ‘शेतकऱ्यांच्या पोटी आपण परत कधीच जन्माला येणार नाही, शेतकऱ्यांसाठी हे सरकार काही करू शकत नाही, गेम इज द ओवर’ असे म्हणत सूरजने विषाचा कडवा घोट घेतला. त्यातच उपचारादरम्यान मृत्यू झाला.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Young #farmer's #suicide #MLA #Avtade #parichark #help, #तरुण #शेतकरी #आत्महत्या #आमदार #आवताडे #परिचारक #एकलाख #मदत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी काही माझी वाईट अवस्था झाली नाही, शरद पवारांचा टोला
Next Article सगळीकडे मंदिरात नंदी दूध पितोय, पण खरं काय…वाचा सविस्तर

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?