पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे पालिकेत आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळ येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले. मोदी यांनी पुणे महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्घाटन केले.
पंतप्रधान गरवारे स्टेशनकडे रवाना झालेत. विमानतळावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ले.ज.जय सिंह नैन, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते. त्यानंतर मोदी हे पुणे महापालिकेच्या दिशेने रवाना झाले. Modi inaugurates statue of Chhatrapati Shivaji Maharaj
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पंतप्रधानांनी आधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. मोदींच्या समवेत यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान मोदींचा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, पंतप्रधानांसाठी बनवलेला खास फेटा आणि उपकरणे भेट देऊन विशेष सत्कार केला. या नंतर पंतप्रधानांनी तिथे उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने भाजपाचे नगरसेवक होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे दोघेही त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री महत्त्वाच्या कार्यक्रमांना आणि बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत. सध्या मुख्यमंत्र्यांना प्रवास करणं शक्य होत नसल्यामुळे ते पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.