सोलापूर : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाखाची लाच मागून ५० हजार रुपये स्वीकारताना सोलापूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
सोलापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये तक्रारदाराच्या इतर नातेवाईकांना आरोपी न करण्यासाठी ५० हजाराची लाच मागितल्याप्रकरणी जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिनेश श्रीकांत कुलकर्णी (वय ३२ रा. जांदगाव ता. तुळजापूर) यास लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने अटक केली.
यातील आरोपी लोकसेवक यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने मंगळवारी दिला. या प्रकारामुळे शहर पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.
जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात जानेवारी अखेर एक तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्यांमध्ये तक्रारदाराची पत्नी, सासू, मेहुणा, मेहुणी आणि तिचा नवरा हे देखील आरोपी होतात. जर त्यांना आरोपी करायचे नसेल तर लाख रुपयाची लाच सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी याने तक्रार दाराकडे केली होती. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात संपर्क साधून तक्रार नोंदवली होती.
लाचलुचपतच्या पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून पोलीस अधिकारी कुलकर्णी याला जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दिनेश कुलकर्णी आला १० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
ही कारवाई लाचलुचपतचे उपअयोक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाठिक, पोलीस नाईक कोष्टी, पवार, सण्णके आणि सुरवसे आदांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महाडिक हे करीत आहेत. In Solapur, corrupt APIs were handcuffed and handed over to police custody
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ पाईपने जबर मारहाण; आरोपीला एक वर्षाचा कारावास
सोलापूर : पाईप कापण्याचे मशीन का दिले नाही म्हणून मुनाफ नदाफ (रा.शुक्रवार पेठ) यांना उत्तम नागनाथ यमपुरे याने जबर मारहाण केली. त्याच्याविरुध्द 22 ऑगस्ट 2013 रोजी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार चार साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालयाने तो पुरावा ग्राह्य धरून मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. आय. भंडारी यांनी या प्रकरणातील आरोपी यमपुरे याला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच द्रव्य दंडाचीही शिक्षा दिली. सरकारतर्फे अमर डोके यांनी तर आरोपीतर्फे ऍड.ए.एन.शेख यांनी काम पाहिले.
□ समर्थ नगरातून दुचाकी चोरी
सोलापूर : शहरातून दुचाकी चोरीचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. राधाकृष्ण कुटन नायर (रा. आकाश गंगा सोसायटी, रहाटणी, पुणे) यांच्याकडे संतोष जगन्नाथ पवार यांचे भाऊ ज्योतीराम पवार हे कामाला आहेत. त्यांच्या बाळे परिसरातील समर्थ नगर येथून चोरट्याने त्यांच्या घरासमोरील दुचाकी (एमएच 09, डब्ल्यू 1088) चोरून नेली आहे. या प्रकरणी नायर यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस नाईक डोके हे करीत आहेत.