मुंबई : शिवसेनेला नोटा पेक्षा कमी मतदान झालं आहे. राज्या बाहेर पक्षाच्या विस्तारासाठी शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेश येथे विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावत आहे. तर आज मतमोजणीला सुरुवात झाली असून 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार शिवसेनेला गोव्यात 0. 25 तर नोटाला 1.20 टक्के तसेच उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला 0.02 तर नोटाला 0.71 टक्के मत मिळाली आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या देशातील पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. दरम्यान गोवा विधानसभा निवडणूकीत भाजप आणि काँग्रेस मध्ये चुरस असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात केलेले प्रयत्न अपुरे पडले असून संजय राऊत फेल ठरले आहेत.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं पडली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. कारण 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. अजूनही मतमोजणी सुरु असून मतांचा वाटा पुढे-मागे होण्याची शक्यता आहे. Shiv Sena – Less than NCP votes; Sanjay Raut Fell
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गोव्यात आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार भाजप 19 तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. मगोप ला 5 जागांवर आघाडी मिळाली असून आम आदमी पार्टी 1 जागांवर आघाडी आहे. गोव्यात शिवसेना- आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत हे गोव्यात तळ ठोकून होते. तसेच युवा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील शिवसेनेचा जोरदार प्रचार केला होता. मात्र मतदारांनी शिवसेनेला नाकारल्याचे दिसत आहे.
□ टोमणे मारण्यास सुरुवात
या निकालानंतर भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टोमणे मारणे सुरू झाले आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, इसवी सन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार आहे. उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो. उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा… सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले…अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल हारले..’एक मासो आणि खंडी भर रस्सो!’ अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल.. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील, असं ते म्हणाले. शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात.. ‘आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ!’ असं शेलारांनी म्हटलं आहे.
□ शिवसेना-राष्ट्रवादीला ‘नोटा’ पेक्षाही कमी मतं
गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाल्याचे समोर आले आहे.
– शिवसेना { 0.25% } – राष्ट्रवादी {1.06% }
– नोटा {1.17% } इतर ( 18.98% } –
आप {6.78% }- तृणमूल काँग्रेस (4.89%)
– भाजप ( 33.60% } – गोवा फॉरवर्ड पक्ष {1.14% }
– काँग्रेस 23.54% – महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष 8.60%