● पंजाबमध्ये आम आदमीकडून काँग्रेसची सफाई
नवी दिल्ली : देशात चार राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार, अशी परिस्थिती सध्या निकालावरून दिसून येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू देशात कायम आहे. भारतीय जनता पार्टीला यश मिळालं याचा आनंद साजरा करण्यासाठी सायंकाळी भाजपा मुख्यालयात मोदी येणार आहेत.
कोरोना संकट, शेतकरी आंदोलन, महागाई आणि बेरोजगारी या मुद्यावरून भाजपला फटका बसेल, असा अंदाज होता. मात्र शेतकरी आंदोलन, महागाई, बेरोजगारी यावर मोदींची जादू भारी ठरली आहे. युपीत पुन्हा एकदा भाजप जिंकत आहे. याचे श्रेय मोदींना दिले जात आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार भाजपने बहुमतांचा आकडा पार केला असून विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
उत्तरप्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षात जोरदार लढाई पाहायला मिळली. अखिलेश यादव यांनी भाजपला कडवे आव्हान दिले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेला प्रचार यामुळे भाजपला मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे. Modi’s magic lasts forever! BJP wins in four out of five states
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत जाहीर होत आहेत. बहुतांश ठिकाणचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या चित्रानुसार पाच पैकी तब्बल चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे.
एकीकडे मोदी लाट ओसरली याची चर्चा सुरू होती. मात्र, पुन्हा एकदा यूपी, उत्तराखंडपासून ते थेट गोवा मणिपूरपर्यंत मोदी आणि मोदीचाच करिष्मा सध्यातरी दिसतोय. त्यामुळे २०२४ च्या लोकसभेची देशाची गादी पुन्हा एकदा मोदींकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
देशभरात गाजलेले उत्तर प्रदेशातील कोरोना मृत्यू, गंगेच सोडून दिलेले मृतदेह यावरून जोरदार राजकारण झाले. मात्र, तरीही उत्तर प्रदेशमध्येही पुन्हा एकदा योगींच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार येताना दिसत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. या ठिकाणी आतापर्यंत हाती आलेल्या कौलानुसार २७३ जागा भाजपच्या खात्यात जाणार आहेत. यावरून येथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असताना दिसते आहे. लोकसभेच्या गादीचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो.
कारण उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जवळपास ८० जागा आहेत. येथे मोदींची जादू चालणे लोकसभेसाठी लाभदायक अपेक्षित होतं. यासाठी भाजपानं सर्व पातळ्यांवर राजकीय मोर्चेबांधणी केली होती. उत्तर प्रदेशात धक्कादायक म्हणजे तेथील काँग्रेस आणि बसपा या दोन मोठ्या राजकीय पक्षांना मतदारांनी नाकारल्याचं चित्र पुढे येत आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षानं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे निवडणुकींच्या कलांनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्याचं जवळपास निश्चितच झालं आहे.
आपनं जवळपास ९० जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस १८ जागांवर आघाडी आहे. निवडणूक निकालांतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह पराभूत झाले आहेत. पटियाला मतदार संघातून अमरिंदर सिंह यांचा पराभव झाला आहे. पटिलायामध्ये आम आदमी पक्षाचे अजित पाल सिंह कोहली विजयी झाले आहेत.
युपी निकाल योगी झुकेगा नाही, व्हायरल होत आहे मीम
#viral #योगी #झुकेगा_नही
#surajyadigital #मीम #YogiAdityanath #सुराज्यडिजिटल #योगी_ही
उत्तर प्रदेशातील 5 राज्यात मतमोजणी सुरु आहे. युपीत भाजप बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. 270 जागांवर भाजप पुढे आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम व्हायरल होत आहेत. भाजपाची आघाडी पाहून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एक मीम व्हायरल झाले आहेत. यामध्ये पुष्पा चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या स्टाइलमध्ये योगी आदित्यनाथ दिसत आहेत. यामध्ये, ‘योगी झुकेगा नहीं’, असे यात लिहिले आहे.
युपीमध्ये बसपाला मोठा झटका
#सुराज्यडिजिटल
■ उत्तर प्रदेशात सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक असलेल्या बसपाला मोठा झटका बसला आहे. बसपाच्या मायावती यांनी उत्तर प्रदेशात 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. एकदा त्यांना स्पष्ट बहुमतही मिळाले होते. #BSP #मायावती #mayawati #surajyadigital #UPElection #UPElection2022
मात्र यावेळी बसपाला मतदारांनी पसंती दिली नाही. बसपाने फक्त 5 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता बसपाची राजकीय वाटचाल कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.