□ ट्विट करुन मानले आभार
लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता स्थापन होणार आहे. भाजपने या ठिकाणी 227 जागा जिंकल्या आहेत. तर 28 जागांवर ते आघाडीवर आहेत. मात्र उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिराथू मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांना समाजवादी पक्षाच्या नेत्या पल्लवी पटेल यांनी 7337 मतांनी पराभूत केले आहे. या ठिकाणी गोंधळ उडाल्यानंतर मतमोजणी रोखण्यात आली होती. शेवटी रात्री निकाल जाहीर करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी 11 मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पराभूत मंत्र्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचाही समावेश आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवार डॉ. पल्लवी पटेल यांनी त्यांचा 7337 मतांनी पराभव केला. पल्लवी पटेल या अपना दलच्या (कमेरावादी) राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
उत्तर प्रदेशमधील ऊस मंत्री सुरेश राणा हे शामली जिल्ह्यातून थानाभवन मतदारसंघातून पराभूत झाले आहे. समाजवादी पक्षाने युती केलेल्या राष्ट्रीय लोकदलच्या अश्रफ अली खान यांनी त्यांचा 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तर, बरेली जिल्ह्यातील बहेडी विधानसभा मतदारसंघातून राज्यमंत्री छत्रपाल सिंह गंगवार यांचा समाजवादी पक्षाचे उमेदवार अताउर्रहमान यांनी 3355 मतांनी पराभव केला.
सिराथू विधानसभा क्षेत्राच्या नागरिकांच्या निर्णयाचा स्वीकार करतो. एका एका कार्यकर्त्याने केलेल्या परिश्रमाचा मी आभारी आहे. ज्या मतदारांनी मला मत दिले त्यांचा मी आभारी आहे, असे ट्विट केशव प्रसाद मोर्य यांनी केले आहे. Shock to BJP! Uttar Pradesh Deputy Chief Minister defeated 11 ministers
"I accept the mandate in Sirathu," tweets UP Deputy CM and BJP's Keshav Prasad Maurya after losing to SP's Pallavi Patel by a margin of 7337 votes.#UPElections2022Results pic.twitter.com/GLjpmix3gi
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 10, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सिरथू विधानसभा मतदारसंघातून सट्टा खेळणारे केशव प्रसाद मौर्य पल्लवी पटेल यांच्याकडून पराभूत झाले. पल्लवी यांना 10,5568 मते मिळाली आहेत, तर केशव प्रसाद यांना 98,727 मतांवर समाधान मानावे लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर बसपचे मुनसाब अली यांना 10,034 मते मिळाली.
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील ग्रामविकास मंत्री राजेंद्र प्रताप सिंह हे प्रतापगड जिल्ह्यातील पट्टी विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या राम सिंह यांच्याकडून 22 हजार मतांनी पराभूत झाले. राज्यमंत्री चंद्रिका प्रसाद उपाध्याय चित्रकूट मतदारसंघातून हे समाजवादी पक्षाचे उमेदवार अनिल कुमार यांच्याकडून 20 हजार मतांनी पराभूत झाले.
राज्यमंत्री आनंद शुक्ला यांना बलियातील बैरियातील समाजवादी पक्षाचे जयप्रकाश अंचल यांनी 12 हजार 951 मतांनी पराभव केला. बलिया जिल्ह्यातील फेफना मतदारसंघातून क्रीडा मंत्री उपेंद्र तिवारी यांना समाजवादी पक्षाचे उमेदवार संग्राम सिंह यांनी 19,354 मतांनी धूळ चारली. उत्तर प्रदेशमधील रणवेंद्र सिंह धुन्नी यांना 25,181 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.
औरिया जिल्ह्यातील दिबीयापूर मतदारसंघातून राज्यमंत्री लाखन सिंह यांना अवघ्या 473 मतांनी पराभव स्वीकारवा लागला. समाजवादी पक्षाचे प्रदीप कुमार यादव यांनी त्यांचा पराभव केला. उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार माता प्रसाद पांडेय यांनी इटवा मतदारसंघातून राज्याचे मंत्री सतीश द्विवेदी यांचा 1662 मतांनी पराभव केला. गाझीपूर मतदारसंघातून राज्यमंत्री संगीता बलवंत यांना 1692 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.