● 75000 हजार रोख आणि जुनी दुचाकी, दोन खोल्यांचे घर
नवी दिल्ली : पंजाब निवडणुकीत मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव झाला आहे. त्यांचा पराभव आम आदमीच्या लाभ सिंह उगोके यांनी केला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले आहे. या विजयाची चर्चा सध्या देशभर सुरु आहे. पंजाबमधील हा विजय ऐतिहासिक म्हटला जात आहे. कारण या पंजाबमध्ये दिग्गजांना सामन्य उमेदवारांकडून मात खावावी लागली आहे.
चरणजीत सिंह चन्नी यांनी श्री चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागा गमावल्या आहेत. भदौरमध्ये एका सामान्य व्यक्तीने सीएम चन्नी यांचा राजकीय पराभव केला. आम आदमी पक्षाने लाभसिंग उगोके यांना उमेदवारी दिली होती. लाभ सिंह यांनी प्लंबरचा कोर्स केला असून ते मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवतात. गरीब कुटुंबातील तरुण लाभसिंग उगोके याने सीएम चन्नी यांचा 37,500 मतांनी पराभव करून इतिहास रचला आहे.
लाभ सिंह उगोके हे मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीत कामाला असून त्यांची आई ही एका सरकारी शाळेत सफाई कर्मचारी आहे. तर वडिल हे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. कॉंग्रेसने केलेल्या नेतृत्व बदल तसेच शेतकऱ्यांचा भाजपबद्दल असलेला आक्रोश या सगळ्यांचा फायदा आम आदमी पक्षाला झाल्याचे दिसत आहे. Mobile repair candidate defeats CM Channy
देश में ईमानदार राजनीति की नई उम्मीदों की ये शानदार जीत आप सभी को मुबारक हो | LIVE https://t.co/di2lAP83FJ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कॅप्टन अमरिंदर सिंग, चरणजित सिंग चन्नी, नवज्योत सिंह सिद्दी, विक्रम सिंह मजिठिया, आणि सुखवीर बादल या दिग्गज नेत्यांचा पंजाब निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची चर्चा मात्र संपूर्ण देशभर सुरु आहे. पंजाबमध्ये आप जोरदार फार्मात आहे. एका सर्वसामान्य माणसानं चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या लाभ सिंह उगोके यांनी चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले कि, तुम्हाला माहितीय? पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांना हरवणारा कोण आहे? त्याचं नाव आहे लाभ सिंग उगोके. हा काय करतो ? तो एका मोबाईल रिपेअर करणाऱ्या कंपनीत नोकरी करतो, त्याची आई सरकारी शाळेत सफाई कामगार आहे, वडील शेतात रोजंदारीवर काम करतात, अशा व्यक्तीने चन्नीला हरवलं आहे’ असे म्हणत केजरीवाल यांनी त्याच कौतुक केलं.
□ 75000 रुपये रोख आणि जुनी दुचाकी, दोन खोल्यांचे घर
मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्याकडे 07 कोटी 97 लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. सीएम चन्नी यांच्या पत्नी कमलजीत कौर या सुद्धा 4 कोटी 18 लाख 45 हजार रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेच्या मालक आहेत. चन्नी आणि त्यांची पत्नी कमलजीत कौर यांच्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे. चन्नी यांच्याकडे 4 कोटींहून अधिक किमतीची निवासी व्यवस्था आहे. तर पत्नीकडेही दोन कोटी 27 लाख 85 हजार रुपयांची निवासी जागा आहे. दुसरीकडे, सीएम चन्नी यांचा पराभव करणारे आपचे उमेदवार लाभसिंग उगोके यांच्याकडे केवळ 75000 रुपये रोख आणि 2014 मॉडेलची जुनी दुचाकी आणि दोन खोल्यांचे घर आहे.
□ 5 कोटी रुपयांची ऑफर
मला माघार घेण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, त्याचा ऑडिओ माझ्याकडे आहे. लाभसिंग उगोके म्हणाले की, आपण व्यवस्था बदलण्याची लढाई लढत आहोत, आपली सदसद्विवेकबुद्धी कोणत्याही किंमतीत बदलू शकत नाही, कारण कुल्लीयोची लढाई राजवाड्यांशी होती, परंतु भदौरच्या भांडखोर जनतेने भांडवलदार चन्नी यांचा प्रचंड बहुमताने पराभव केला.