मुंबई : अभिनेता सुशांतसिंहची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरले आहे. मात्र या अफवा असून, दिशाचा मृतदेह विवस्त्रावस्थेत नव्हता, अशी माहिती मुंबई पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच कुठल्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून ती व्हायरल करू नका, असे आवाहन त्यांनी केले.
वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, त्यावेळी दिशा सालियानचे पालक तिथे हजर होते. दिशाच्या मृत्यूप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दिशाचे वडील सतीश सालियान यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त, मालवणी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई पोलिसांवरील त्यांच्या विश्वासावर आणि पोलिसांच्या तपासाबाबत सतत प्रश्न विचारून पत्रकार आणि माध्यमे त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहेत
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिशाच्या भावी पतीच्या घरी ८ जून रोजी पार्टी होती. पार्टीनंतर मध्यरात्री ३ च्या सुमारास दिशाने आत्महत्या केली. दोन प्रोजेक्टची कामे न मिळाल्याने ती तणावात होती. यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत मालवणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पार्टीला असलेल्या मंडळींसह २० ते २२ जणांचे जबाब नोंदवले आहेत.
मुंबई पोलिस डीसीपी झोन 11 विशाल ठाकूर यांनी सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन संबंधित महत्त्वपूर्ण माहिती सामायिक केली आहे. ठाकूर यांनी दिशासी संबंधित सर्व बातम्यांचे खंडन केले. ठाकूर यांनी रविवारी सांगितले की हे स्पष्ट केले जात आहे की, अशा बातम्या ज्यात म्हटले जात होते की, सालियनचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला होता, त्या पूर्णपणे चूकीच्या आहेत, ठाकूर म्हणाले की, घटनेनंतर पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम केले.