नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 84 वर्षीय प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सेल्फ आयसोलेट करून कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरवरून स्वतः याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान प्रणब मुखर्जी हे काही वेगळ्या कारणांसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेव्हा कोरोनची चाचणी दरम्यान त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी ट्वीटरवरून याची माहिती देताना आठवडाभरात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन केले आहे.
प्रणब मुखर्जी हे 84 वर्षीय आहेत. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना सेल्फ़ आयसोलेट करून कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केले आहे. दरम्यान सध्या भारतामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मेदांता रूग्णालयात उपचार सुरू आहेत.