● मदतनिधीसाठी आले तब्बल साडेअकरा हजार अर्ज
● 6811 वारसांना कोरोना मृत निधी मिळणार, 2858 जणांचे अर्ज नामंजूर
सोलापूर : सोलापुरात कोरोनोने थैमान घातले होते. यात अनेकजण मृत्यूमुखी पडून हजारोजण बेघर झाले. अशांचे भवितव्य अंधारात लोटले गेले. राज्य सरकारने पुढाकार घेऊन वारसांना निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून वारसांना निधी मिळणार आहे.
सोलापुरात 6 हजार 811 वारसांना कोरोना मृत निधी मिळणार आहे. तर आलेल्या अर्जातील 2 हजार 858 जणांचे अर्ज नियमात बसले नसल्याने नामंजूर केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनाने मरण पावलेल्या नातेवाइकांच्या मदतनिधीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुनावणी घेऊन खातरजमा केल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 811 वारसांना मदतनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर 2 हजार 858 जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी फेब्रुवारीमध्ये सुनावणी घेतली होती. In Solapur, coroner’s heirs will get relief funds, so many applications are approved, so many are rejected
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने कोरोना मृतांच्या नातेवाइकांना 50 हजाराची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मृतांच्या कायदेशीर वारसदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हा प्रशासनस्तरावर याची कार्यवाही सुरू आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यातून मदतनिधीसाठी तब्बल 11 हजार 549 अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले होते. यातील काही अर्जांना मंजुरी मिळाली होती. काही अर्जात त्रुटी असल्याने त्याच्यावर सुनावणी घेण्यात आली. काही प्रकरणात एकाच कुटुंबातील अनेक वारसदारांनी मदतीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. सुनावणीनंतर हा पेच सुटला आहे. 6 हजार 811 अर्ज मंजूर तर 2 हजार 858 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्ज निर्णयासाठी प्रलंबित आहेत.