सोलापूर : कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील शंभर एकर जागा खासदार शरद पवार यांच्या नावे शेतकी महाविद्यालयासाठी तसेच आयटी पार्कसाठी साठेखत करून घेतले होते. मात्र या जागेवर मेहुल कन्स्ट्रक्शनचे बिपिनभाई पटेल यांनी आता ताबा घेतला आहे, असा आरोप माजी महापौर मनोहर सपाटे यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
मनोहर सपाटे म्हणाले , महार सोसायटीसाठी आरक्षित असलेली जागा त्या सोसायटीअडून आपण साठेखत करून व्यवहार केला होता , बिपिनभाईंनी त्यांच्याकडून परस्पर ही जागा खरेदी केली आहे. आता याचे वहिवाटदार किंवा मालक आपणच आहोत असे सांगत त्यांनी याठिकाणी अनाधिकारानं प्रवेश मिळवून ताबा घेतला आहे. बिपिनभाई पटेल यांच्या या कृत्याच्या पाठीमागे सुशीलकुमार शिंदे यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे कृत्य होऊ शकत नाही, असा आरोपही सपाटे यांनी केला. Bipinbhai says Sapate’s warning to fast in front of Sushilkumar Shinde’s house is our claim on ‘that’ place
या विरोधात आपण फौजदारी गुन्हा दाखल केलाय. न्यायालयातही गेलो आहोत पण जनतेच्या न्यायालयात ही बाब जावी, यासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानासमोर लवकरच उपोषण करणार आहोत असेही ते म्हणाले. यावेळी मनोहर सपाटे यांचे अनेक समर्थक उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
■ मनोहर सपाटे यांनी केलेल्या आरोपांबद्दल बिपिनभाई पटेल यांचे प्रत्युत्तर
बिपिनभाई पटेल यांनी मनोहर सपाटे यांचे सर्व आरोप चुकीच्या माहितीच्या आधारावर आहेत, त्यांनी साठेखत केले होते पण मुदतीत पुढील व्यवहाराची कोणतीच कार्यवाही केले नाही. आम्ही रीतसर सर्व कागदोपत्री कायदेशीर कार्यवाही करून जागा खरेदी केली आहे. यामुळे सपाटे यांचा त्या जागेवर कोणताच अधिकार नाही. मनोहर सपाटे यांना या साठेखत बाबतचे पैसे वकीलाच्या सल्ल्याने आम्ही खरेदीपूर्वी दिलेल्या चेकची रक्कम रजिस्टर पोस्टाने पाठविले होते पण ते त्यांनी स्वीकारले नाहीत.
आम्ही आमच्या जागेत कंपाऊंड मारले आहे, तिथे सपाटे यांचेच समर्थक येऊन घुसखोरी करतात. विडीओ चित्रकारणातील माणसं त्यांचीच आहेत असे बिपिनभाई पटेल म्हणाले, या व्यवहारात सुशीलकुमार शिंदे किंवा अन्य कोणाचाही सहभाग, सहमती, पाठिंबा नाही. त्यांच्या घरासमोर उपोषणास बसण्यामागे अन्य काही हेतू असावा, असे बिपिनभाई पटेल यांनी सांगितले आहे.