Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेटफळजवळ पहाटे मालट्रक पलटी, ऊसतोड मजूर ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शेटफळजवळ पहाटे मालट्रक पलटी, ऊसतोड मजूर ठार

Surajya Digital
Last updated: 2022/03/13 at 8:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मोहोळ : मोहोळ पंढरपूर शेटफळ रोडवर शेटफळ जवळ वाघगज वस्ती दरम्यान माल ट्रक पलटी झाल्याने एक जण मयत झाला. हा अपघात आज रविवारी (१३ मार्च)  पहाटे पाच वाजणेच्या दरम्यान झाला.

याबाबत मोहोळ पोलिसानी  दिलेल्या माहितीनुसार ,  कोल्हापूर   येथून ऊस तोडणी  मजूर, प्रापंचिक साहित्य, म्हैस  गावाकडे बीड जिल्ह्यात घेवून निघाले होते. त्याच्या ओळखीच्या असणारे माल वाहतूक (क्रमांक एम एच ०९ एफ एल३८५२) या मालट्रकच्या पाठीमागे मालासोबत धरुन बसले होते.

कोल्हापूरहून पंढरपूर मार्गे शेटफळ जवळ आल्यानंतर ड्रायव्हरचा वाहनांवरील ताबा सुटला. त्याने रस्ताच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहन चालवत विरोधी बाजूस जाणून पलटी झाला. यात लक्ष्मण मानीकराव बाहीरवाल (वय ५० रा. भाळवणी ता.जि. बिड) याच्या डोक्यास मार लागून जखमी झाला.

हा अपघात रविवारी पहाटे पाच वाजणेच्या सुमास घडला. जखमीस  मोडनिंब येथे  सरकारी दाखवण्यास उपचारास दाखल करण्यात आले होते परंतु उपचारापूर्वी ते मयत झाले असल्याचे  डॉक्टराने  सांगितले.   याबाबत  वाहन चालक सुभाष शिवाजी गुजर (रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहे.

A truck overturned near Shetfal in the morning, killing a sugarcane worker

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ तामलवाडी टोल नाक्याजवळ खाजगी बसच्या धडकेने दुचाकी चालक ठार

सोलापूर – तुळजापूर मार्गावरील तामलवाडी टोलनाक्याजवळ खाजगी बसच्या धडकेने दुचाकी चालक ठार झाला हा अपघात शुक्रवारी (ता. ११) रात्रीच्या सुमारास घडला.

विनोद सुरेश मोरे (वय २७ रा. तामलवाडी ता.तुळजापूर) असे मयताचे  नाव आहे. तो काल रात्री ११ वाजेच्या सुमारास सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने निघाला होता. तामलवाडी टोल नाक्याजवळ (एनएल०१-बी-१९८२) या क्रमांकाची खाजगी बस धडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला. या अपघाताची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

□ टेंभुर्णीजवळ दुचाकी घसरल्याने तरुण ठार

सोलापूर – वेगाने जाणारी दुचाकी घसरल्याने एक जण ठार तर दुसरा जखमी झाला. हा अपघात टेंभुर्णी ते वेणेगाव रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडला.

राहुल बाळू कुडाळकर (वय२६ रा. तळेगाव दाभाडे ता.मावळ जि.पुणे) असे मयताचे नाव आहे. तो काल सायंकाळच्या सुमारास दिगंबर मुंडे (वय २४ रा.कडबे गल्ली,पंढरपूर) याच्या सोबत दुचाकीवरून टेंभुर्णी ते वेणेगाव असा प्रवास करीत होता. वाटेत दुचाकी घसरल्याने दोघेही जखमी झाले. त्यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यापेकी राहुल कुडाळकर हा शनिवारी दुपारी मरण पावला. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

□  नळदुर्ग अपघात; जखमीचा मृत्यू

नळदुर्ग येथे अपघातामध्ये जखमी झालेला अविनाश संजय कांबळे (वय २० रा. नळदुर्ग ता. तुळजापूर) हा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना शनिवारी (ता. १२) मरण पावला. तो ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास नळदुर्ग येथील घरापासून बसस्थानकाकडे निघाला होता. भीमनगर येथे स्पीड ब्रेकर वरून दुचाकी आदळल्याने तो खाली कोसळून जखमी झाला होता. त्याला नळदुर्ग येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशी प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #truck #overturned #Shetfal #morning #killing #sugarcane #worker, #शेटफळ #पहाटे #मालट्रक #पलटी #ऊसतोड #मजूर #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रसिध्द अभिनेत्रीने पाकिट मारले, पोलिसांनी केली अटक; बॅगेत सापडली हिशेबाची डायरी
Next Article बार्शी : अफूची लागवड करणार्‍यांना तिघांची पोलिस कोठडीत रवानगी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?