बंगळुरू : कर्नाटक हायकोर्टाने आज शाळेतील हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. तसेच हिजाब मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. कर्नाटकमधील काही शाळेत मुलींना हिजाब घालून येण्यास बंदी घालण्यात होती. त्यानंतर सहा मुलींनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर शाळेत शाळेचाच गणवेश हवा, शाळेत हिजाबवरील बंदी योग्य आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवले होते. उडुपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या सहा विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला होता. त्यानंतर विरोध सुरु केला होता. हा विरोध इतर जिल्ह्यांमध्ये पसरला आणि मोठा वाद निर्माण झाला. काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल घालून येऊ लागल्याने तणाव निर्माण झाला होता.
गेल्या काही महिन्यांपासून देशभरात सुरू असलेल्या हिजाब वादासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निकाला दिला आहे. याप्रकरणी सुनावणी देत कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नाही आणि शाळकरी विद्यार्थीनी शालेय गणवेश घालण्यासाठी नकार देऊ शकत नाही.
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचे स्पष्ट करत मुस्लिम विद्यार्थीनींनी शाळा, कॉलेजमध्ये हिजाब घालण्यास परवानगी देण्याची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी आज कर्नाटकच्या काही जिल्ह्यांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आला होता, जेणेकरून कोणतीही हिंसा उफाळून येऊ नये.
शाळा, कॉलेजमध्ये हिजाब घालण्याची परवानगी देण्याबाबतच्या याचिकेप्रकरणी ९ फेब्रुवारीला सरन्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायाधीश कृष्णा एस दीक्षित आणि न्यायाधीश जेएम खाजी यांच्या खंडपीठाची स्थापना केली होती.
कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी राज्यभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. कोप्पल, गडग, कलबुर्गी, दावणगेरे, हासन, शिवमोगा, बेलगांव, चिक्कबल्लापूर, बेंगलुरू आणि धारवाडमध्ये १४४ कलम लागू केले. शिवमोगामध्ये शाळा, कॉलेज बंद केले होते. तर कर्नाटक उच्च न्यायालयातील जज यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
Hijab case finally gets a big court decision, wearing hijab in school is banned
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला. उडुपी येथील कॉलेजमधील काही विद्यार्थींनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांना अडवण्यात आले. कॉलेज प्रशासनाने ड्रेसमध्ये समानता असावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
पण यावरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. याप्रकरणी विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या हिजाब वादाचे पडसाद संपूर्ण देशभरात यला मिळाले. काही शाळेत हिजाबच्या समर्थनार्थ आणि विरोध आंदोलन केले गेले. एवढेच नाही तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.
हिजाब प्रकरणी मुलींनी हायकोर्टात जाऊन हिजाब परिधान करुन वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी केली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब किंवा भगवी शाल घालण्यास परवानगी नसल्याचा अंतरिम आदेश जारी केल्याने याचिकाकर्त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
□ हिजाब प्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर दिग्गजांच्या प्रतिक्रिया
– हा निकाल म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्यांना
चपराक – उज्वल निकम
– आपण कुठल्या काळात राहतोय, याचं भान ठेवायला हवं
– शमशुद्दीन तांबोळी – प्रत्येकाने हायकोर्टाचा आदेश मान्य करून शांतता राखावी : प्रल्हाद जोशी
– शिक्षण का हिजाब महत्त्वाचं काय? मुसलमानांनी ठरवावं हुसेन –
दलवाई