Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईत प्रविण दरेकरांविरूध्द गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मुंबईत प्रविण दरेकरांविरूध्द गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/03/15 at 6:28 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. योगायोग म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा दावा विधानसभेत केला होता. त्यानंतर आज दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रवीण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत ते निवडूनही आले होते. या प्रकारामुळे प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. याच प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Crime filed against Praveen Darekar in Mumbai

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली.

● प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने सूड भावनेने गुन्ह्याची नोंद झाली आहे. अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र सुरु आहे. पण हाती काही लागलं नाही, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

कुठल्याही परिस्थिती गुन्हा दाखल करण्यासाठी अजित पवारांवर दबाव आणल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. प्रवीण दरेकर आणि भाजपवर दबाव आणून आपल्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईला ब्रेक लावता येईल का यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु असल्याचा दावाही दरेकर यांनी केला.

● देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार, हे मी कालच सभागृहात सांगितले होते. मुंबै बँकेसंदर्भात अहवाल तयार झाला तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले की, बँकेत गडबड, घोटाळे झाले तेव्हा सत्ताधारी पक्षातीलच अनेक लोक त्याठिकाणी होते. त्यामुळे सरकारने मजूर संवर्गातून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.”

पुढे त्यांनी म्हंटले की, “प्रवीण दरेकर हे मजूर संवर्ग आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही संवर्गातून निवडून आले होते. त्यांनी स्वत:हून मजूर संवर्गातील अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता मजूर फेडरेशनचा सदस्य असणे हा गुन्हा ठरत असेल तर राज्यातील मजूर संघटनाच्या पदांवर असणाऱ्या सर्वच व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. तर, ‘प्रवीण दरेकर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते आपल्याविरोधात बोलतात म्हणून सरकारने त्यांच्यावर कारवाई केली’ अशी टीकादेखील त्यांनी केली.

 

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #Crime #filed #PraveenDarekar #Mumbai #bank, #मुंबई #प्रविणदरेकर #गुन्हा #दाखल #मुंबै #बँक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आम्हाला जनतेचा काँग्रेस पक्ष पाहिजे, घराणेशाही नको, राहुल गांधींनी कोणत्या अधिकाराने ती निवड केली
Next Article ‘द काश्मीर फाईल्स’ला रोखण्याचे षड्यंत्र सुरू – मोदी

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?