Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2022/03/16 at 10:55 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

● सहा वेळा विधानसभेमध्ये आमदार 

अहमदनगर : कोपरगाव (जि. अहमदनगर)- माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे होते. सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. शंकरराव कोल्हे यांचा 21 मार्च 2022 रोजी 95 वा वाढदिवस होता. वाढदिवसाला  5 दिवस होते. त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे.

आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती.येत्या 21 मार्चला शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानं कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहावर शोककळा पसरली आहे. शंकरराव कोल्हे यांचे ‘सत्याग्रही शेतकरी’ हे आत्मचरित्र आहे.

कोल्हे यांनी 1960 मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले. 1985 ते 1990 चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते. त्यांच्या जाण्यानं तालुक्यात शोककळा परसली आहे. सहकारातील महान व्यक्तीमत्वाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. Former Minister Shankarrao Kolhe passes away in Ahmednagar

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

● कोण होते शंकरराव कोल्हे?

सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज निधन झाले. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. शंकरराव कोल्हे यांचे ‘सत्याग्रही शेतकरी हे आत्मचरित्र आहे.

कोपरगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहा दशकांमध्ये महसूल, कृषी, परिवहन आणि उत्पादन शुक्ल या खात्याचे मंत्रिपद भुषवलं आहे. तसेच त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करुन दाखवले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी आग्रही भूमिका मांडणे आणि अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांना ओळखले जायचे.

1985 ते 1990 चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते. कोल्हे यांनी 1960 मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली.सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत अनेक पायलट प्रकल्प दिले.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

TAGGED: #FormerMinister #ShankarraoKolhe #passesaway #Ahmednagar, #माजीमंत्री #शंकररावकोल्हे #निधन #अहमदनगर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पिक हाती येईपर्यंत पुढील तीन महिने वीजतोडणीला स्थगिती, भाजपच्या मागणीला यश
Next Article आयपीएल – मनसेने मुंबईत ताज हॉटेलसमोरील बस फोडल्या

Latest News

आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
देश - विदेश June 25, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमधून 282 भारतीय मायदेशी परतले
देश - विदेश June 25, 2025
जम्मू-काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दहशतवादी ठार
देश - विदेश June 25, 2025
नीरज चोप्राने ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइकमध्ये सुवर्णपदक जिंकले
देश - विदेश June 25, 2025
इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?