Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांना कोकणात धक्का; सहकार क्षेत्रातील गुलाबराव चव्हाणांचा ‘निलरत्न’ वरुन भाजपात प्रवेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांना कोकणात धक्का; सहकार क्षेत्रातील गुलाबराव चव्हाणांचा ‘निलरत्न’ वरुन भाजपात प्रवेश

Surajya Digital
Last updated: 2020/08/10 at 5:45 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सिंधुदुर्ग : आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारातील नेते, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत आज सोमवारी राणेंच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रवेशासाठी आमदार नितेश राणे यांनी खास प्रयत्न केले होते. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या सहकार क्षेत्राला खिंडार पडले आहे. जिल्ह्यातील सहकारातील बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती रविवारी रात्री उपलब्ध झाल्यापासून हा बडा नेता कोण ? याबाबत उत्सुकता लागली होती. जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण राणेंच्या मालवण येथील निलरत्न निवासस्थानी दाखल झाल्यानंतर ही उत्सुकता संपुष्टात आली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार नितेश राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली, आमदार प्रसाद लाड, आमदार भाई गिरकर, आमदार रमेश पाटील, प्रदेश सचिव प्रमोद जठार, अतुल काळसेकर, अशोक सावंत, दिलीप रावराणे, संजय चव्हाण, राजू राऊळ, सुदेश आचरेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, मालवण तालुका अध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, बाबा परब यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

गुलाबराव चव्हाण हे सहकार क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व आहे. सहकार महर्षी शिवराम जाधव यांच्या पासून ते राष्ट्रवादी पक्षात व जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. जिल्हा बँकेच्या सत्तेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गुलाबराव चव्हाण यांच्या भारतीय जनता पार्टीत झालेल्या प्रवेशामुळे जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांना फार मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप पदाधिकारी यांनी दिली आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #कोकण #शरदपवारांनाधक्का #भाजपात #प्रवेश #निलरत्न #धक्का
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण
Next Article पार्थ पवारांनी घेतली पुन्हा पक्ष, शरद पवारांविरुद्ध भूमिका; वैयक्तिक भूमिका असल्याचे सुप्रिया सुळेंचे मत

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?