● आमच्या पक्षातील गद्दारांच्या मदती मुळे व अपघाताने सचिन कल्याणशेट्टी आमदार झाले
अक्कलकोट : माझ्या चुकीने आणी आमच्या पक्षातील काही गद्दारांच्या मदतीने जे मिळालेल्या मताधिक्याचे एवढं गर्व असेल तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा मैदानात यावे, कोण किती मताधिक्य घेईल ते सगळ तालुक्याला तरी सोडा,अख्खा जगालाच कळणार आहे, असे आव्हान माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिले आहे.
मागील आठवड्यात अक्कलकोट तालुक्यातील विकासकामांसंबधी चाललेल्या श्रेयवादाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्यावर अनेक आरोप केले होते. यासाठी म्हेत्रे यांनी पत्रकार परिषद घेत कल्याणशेट्टी यांचा खरपूस समाचार घेतला.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी आजवरच्या कारकिर्दीत हजारो कोटींची विविध विकासकामे आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केले. पण कधी प्रसिद्धीसाठी हापापलो नाही. आज परिस्थिती बदलली आहे. लाखाची कामे केली तरी मिडीयामध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी हे आमदार झाले खरे,पण सत्ता आमची आली. मी देखील ग्रामविकास खाते सांभाळलेले आहे. ते कल्याणशेट्टी विसरले. माझ्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी भरभरून निधी देत आहे. पण ही कामे मीच केली आहेत, हे जनतेसमोर सांगणाऱ्या आमदार सचिन कल्याणशेट्टींनी आत्मपरीक्षण करावे. फेसबुकचा आमदार कोण आणि जमिनीवरचा आमदार कोण? या प्रश्नाचे उत्तर सबंध जिल्ह्याला माहित असल्याची टीका माजी ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर केली. Who is the MLA of Facebook and who is the MLA on the ground? Siddaram Mhetre’s reply to Sachin Kalyanshetty’s allegations

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आरोपासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
त्यांनी विधानसभेचा व तालुक्याचा अभ्यास करावा त्यांना काम करताना काही अडचण आल्यास आम्हाला सांगावे, आम्ही त्यांना मदत करु, पण सिद्धाराम म्हेत्रे नी कधीही विकास कामात अडथळा केले नाही आणि करणार देखील नाही. कोणी का असेना. मी तत्त्वनिष्ठ वागणारा माणूस आहे, स्वतःची उंची म्हेत्रे नी कधीच कमी केलेले नाही, माझं तरी सोडा मी विरोधकांचा देखील कधीच उंची कमी केलेले नाही. विरोधकांचे तरी सोडा दुश्मनचा देखील उंची कधीही कमी होऊ देणार नाही. ह्या भावनेने मी आज पर्यंत वागलो आहे, म्हणून दुसऱ्यांच्या उंची मोजण्याच्या नादात आमदाराने स्वतःची उंची कमी करून घेऊ नये, एवढंच आमचे त्यांना प्रेमाच सल्ला आहे. व प्रोटोकाॅलप्रमाणे तुम्ही विकासकामांचे भूमिपूजन करा.परंतु जनतेसमोर मीच ही कामे केली. माझा पाठपुरावा कामी आला,अशी फसवणूक करत फिरू नका. सद्यस्थितीत अनेक कामे आम्ही आणली असताना तुम्ही भूमिपूजन केल्याचा आरोप म्हेत्रे यांनी केला.
पत्रकार परिषदेस दुधनी मार्केट कमिटीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, मा जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जून पाटील, सोलापूर बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, सरपंच व्यंकट मोरे, महिला तालुका अध्यक्षा मंगल पाटील, मा नगरसेवक डाॅ.उदय म्हेत्रे, मा उपसभापती विलास गव्हाणे उपस्थित होते.
□ स्व.पंचप्पा गुरूजींमुळे आजवरचा संयम.. पण आता पुढे नाही!
पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी कल्याणशेट्टी व म्हेत्रे परिवाराच्या संबंधांवर प्रकाश टाकत सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे वडिल स्व.पंचप्पा कल्याणशेट्टी हे माझे चांगले सहकारी होते. तसेच मला आमदार करण्यासाठी त्यांनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. सचिन कल्याणशेट्टी आमदार झाल्यानंतर माझ्या घरातील माणूस आमदार झाल्याची भावना आमच्या मनात होती. परंतु ज्या पद्धतीने विद्यमान आमदारांचे वागणे सुरू आहे,याचे मनाला खुप वाईट वाटत आहे.त्यांनी आजवर केलेल्या टीकेला कधीच उत्तर दिले नव्हते.जाऊदे, आपल्याच घरातील माणूस आहे.वयाने लहान आहे,ही भावना ठेऊन शांत होतो.केवळ स्व.पंचप्पा गुरूजींच्या उपकाराची जाणीव असल्याने संयम ठेवला. परंतु इथुन पूढे सडेतोडपणे राहणार असल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.
