□ पुढील पाच वर्षांसाठी भाजपचे डबल इंजिन सरकार कार्यरत
पणजी : प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली आहे. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी रवी नाईक, निलेश कबराल, सुभाष शिरोडकर, विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान गोव्यात भाजपला विधानसभा निवडणुकीत 20 जागा मिळाल्या आहेत.
प्रमोद सावंत यांच्यासोबत रवी नाईक, नीलेश क्राबल, विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, सुभाष शिरोडकर यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी 10 वाजता गोवा विमानतळावर आगमन झाले. जिथे त्यांचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद सेठ यांनी स्वागत केले.
श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडिअमवर हा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत विश्वजीत राणे, सुभाष शिरोडकर, रोहन खौंटे, रवि नायक, मौविन गोडीन्हों, निलेश काब्रल, गोविंद गौड आणि अटॉनोसियो मोन्सेरात या आठ मंत्र्यांनीदेखील पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. गोव्याच्या इतिहासात हा शपथविधी पहिल्यांदाच अभूतपूर्व असा झाला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. Goa – Pramod Sawant sworn in as Chief Minister
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
प्रमोद सावंत गोव्यातील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये या सरकारची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, आसामचे मुख्यमंत्री हेमंत शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री डॉ. मंत्री आणि स्वराज मुंबई उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी, मणिपुरचे वीरेंद्र सिंह सामील होते.
या सर्व मंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच गोमांतक पक्षाने भाजपला पाठिंबा दर्शवल्याने गोव्यात स्थिर सरकार स्थापन होऊ शकते. तर मुख्यमंत्री सावंत आज कॅबिनेट बैठक बोलवणार असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यातही पुढील पाच वर्षांसाठी भाजपचे डबल इंजिन सरकार कार्यरत राहणार आहे.