□ गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलता बोलता सदाभाऊ खोत शरद पवारांवर घसरले
सोलापूर – शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे काम केले, त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे. त्यांच्या आगलावे धोरणामुळे महाराष्ट्र होरपळून निघाला, ते कुठतरी आतां थांबलं पाहिजे असं म्हणाताना सदाभाऊ खोत यांनी एका घरात आग लावायची तिथलं झालं की दुसऱ्या घरात आग लावायला जायचं काम शरद पवार करतात, अशी बोचरी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
सांगलीतल्या अहिल्यादेवी यांच्या स्मारकाच्या वादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या स्मारकाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, त्याआधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले. याबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. आज सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर आले तेंव्हा पत्रकारांशी बोलत होते. ते सोलापूरमध्ये बोलत होते. शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केलं, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केलाय.
शरद पवारांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचं काम केलंय, असं सदाभाऊ खोत म्हणालेत. सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते आज शेतकरी मेळाव्याला हजर राहणार आहेत. त्यापू्र्वीच त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आता याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी यापू्र्वीही शरद पवारांवर पंतप्रधान पदावरूनही टीका केली होती.
Sadabhau Khot was set on fire by Sharad Pawar
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना मी येऊ दिलं नाही. मात्र, येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्कीच, असं ट्विट करत खोतांनी पवारांवर टीका केली होती. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले. पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले आहे. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.
यावेळेस त्यांनी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीतील मातोश्री उल्लेखावरुनही निशाणा साधला. “आईला काही उपहार दिले असेल तर ते आम्ही डायरीत लिहून ठेवत नाही. आईचे अनंत उपकार असतात, पण आई वसुलदार असेल मात्र लिहून ठेवले जाते. नामकरण झालेल्या मातोश्रींवर उपकार केलेले मात्रं लिहून ठेवले जातात. आई ही वसुली अधिकारी नसते मात्रं जिथं वसुली होते तिथं मात्र लिहून ठेवले जाते,” असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
सदाभाऊ खोत यांच्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
□ ठळक मुद्दे
– सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवार खरपूस टीका
– शरद पवारांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे – सदाभाऊ खोत
– शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात केवळ काड्या करतात
– उभं आयुष्य त्यांचं आग लावण्यात गेलं
– शरद पवार हे फक्त आग लावण्याचं काम करतात. त्यामुळे शरद पवारांचं आडनाव बदलून आगलावे ठेवावे.
– एका घरात आग लावायची तिथलं झालं की दुसऱ्या घरात आग लावायला जायचं काम शरद पवार करतात
□ यशवंत जाधव डायरी संदर्भात
– आईला काही उपहार दिलं असेल तर ते आम्ही डायरीत लिहून ठेवत नाही
– आईचे अनंत उपकार असतात त्यामुळे आईला काही दिलं तर ते डायरीत कोणी लिहुन ठेवत नाही
– पण आई वसुलदार असेल तर मात्र लिहून ठेवले जाते
-नामकरण झालेल्या मातोश्रींवर उपकार केलेले मात्रं लिहून ठेवले जातात
– आई ही वसुली अधिकारी नसते मात्रं जिथं वसुली होते तिथं मात्र लिहून ठेवले जाते