अकलूज : तळ्यावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या आई व दहा वर्षाचा मुलगा दोघेही पाय घसरुन तळ्यात पडले. पाण्यात दोन्ही माय-लेकरं जीवाच्या आकांताने सुरु असलेली आरडा-ओरड ऐकून तिथे असलेल्या सातवीत शिक्षण घेणा-या तीन बालकांनी आपल्या जिवाची बाजी लावून धाडसाने माय-लेकरांचा जीव वाचविला.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शंकरनगर (किर्तीनगर) येथील ज्योती विजय शेळके या धुणे धुण्यासाठी तळ्यावर गेल्या होत्या. त्यांच्या सोबत त्यांचा दहा वर्षाचा मुलगा सोमनाथ हा ही आई सोबत तळ्यावर गेला होता. त्यावेळी सोमनाथचा अचानक पाय घसरुन तो पाण्यात पडला. आपला मुलगा पाण्यात पडल्याचे पाहून मातेच्या जिवाची घालमेल सुरु झाली. त्याला वाचविण्याच्या गडबडीत त्या मातेचाही पाय घसरला.
दोघेही माय-लेकरे पाण्यात बुडु लागले. पाणी नाका-तोंडात जावू लागले. जीवाच्या आकांताने माय-लेकराची सुरु असलेली आरडा ओरड तळ्यात म्हैस धुण्यासाठी गेलेल्या व यशवंतनगर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा यशवंतनगर येथे इयत्ता ७वी.मधील विद्यार्थी श्रेयस श्रीकृष्ण पाटोळे ,रोहन हनुमंत पाटोळे व इ ५ वीत शिकणारा अभिजीत हनुमंत पाटोळे या बालकांच्या कानी आली. तेव्हा धावतच तिनही बालके माय-लेकरांच्या जवळ आले.
Akluj: Three Chimukals of 7th saved the lives of drowning my children by risking their lives
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दोघांची जीव वाचविण्यासाठी सुरु असलेली धडपड त्या बालकांच्या लक्षात आली. यावर क्षणाचाही विलंब न लावता सर्वात मोठ्या असलेल्या रोहनने मागचा पुढचा विचार न करता आपल्या जीवाची बाजी लावुन पाण्यात उडी घेतली. त्याने बुडणाऱ्या सोमनाथचा हात धरून त्याला पाण्यातून बाहेर ओढले. त्याचे तिथे उपस्थित असलेल्या दोघांनीही रोहनला साथ देत तिघांनी मिळून सोमनाथला वाचवले.
सोमनाथला बाहेर काढेपर्यंत त्याची आई ज्योती या खूप खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्या. रोहनने पुन्हा एकदा जीव पणाला लावत पाण्यात झेप घेतली. त्यांना हाताला धरून ओढत- ओढत सुखरुप काठावर आणले आणि माय-लेकरांना मरणाच्या दाढेतून खेचून बाहेर काढले.
या तीन मुलांच्या प्रसंगावधान व धाडसामुळेच एका आईचे व मुलाचे प्राण वाचले. अतिशय लहान वयातील बालकांचे धाडस आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे दोन जीव वाचले. याचं सर्व स्तरातून या तीनही मुलांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
अकलूज कृ.उ.बाजार समितीचे सभापती तथा माजी जि.प.अध्यक्ष व यशवंतनगर शाळेचे शाळा व्यव. समितीचे शिक्षणतज्ञ व मार्गदर्शक मदनसिंह मोहिते – पाटील यांनीही मुलांचे कौतुक केले. त्यांचे भावी आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेनेही शौर्य गाजवलेल्या मुलांचे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.