Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कुंभारी येथील खून झालेल्या तरुणाची ओळख पटली; दोघांना सुनावली कोठडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

कुंभारी येथील खून झालेल्या तरुणाची ओळख पटली; दोघांना सुनावली कोठडी

Surajya Digital
Last updated: 2022/04/01 at 5:27 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : मंगळवारी दुपारच्या सुमारास एका २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील साईस्वरूप हॉटेल शेजारच्या कोरड्या विहिरीत खून केलेल्या अवस्थेत आढळला होता.

वळसंगच्या पोलिसांनी या प्रकरणात अनोळखी इसमाचा विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला होता. खून झालेल्या तरुणाचे नाव नरेश नागेश चिंता (वय २४ रा. क विभाग, नवीन परकुल कुंभारी) असे आहे. त्याचा खून केल्याप्रकरणी राहुल यल्लप्पा पुरुड (वय २२) आणि रिक्षाचालक अनिल दत्तात्रेय राडम (वय २४ रा. नवीन घरकुल, कुंभारी) या दोघांना
अटक केली. त्यांना ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश अक्कलकोटच्या न्यायालयाने गुरुवारी (ता.31) दिला.

मयत नरेश चिंता हा अविवाहित असून तो हैदराबाद येथे मजुरी करीत होता. त्याच्या परिचयातील राहुल पुरुड बरोबर दुचाकी गहाण ठेवण्याच्या कारणावरून दोघात तक्रार झाली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास चिंता आणि पुरुड या दोघांनी कुंभारी येथील रुग्णालय समोरच्या मोकळ्या मैदानात बसून पार्टी केली होती. त्यावेळी दोघात दुचाकीच्या कारणावरून वाद झाला. तेव्हा राहुल पुरुड याने खिशातील कात्री काढून त्याच्या डोक्यावर प्रहार करून खून केला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याने अनिल राडम या आहेत.

The murdered youth at Kumbhari was identified; Both were remanded in custody

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

रिक्षाचालकाला बोलावून घेतले. आणि नरेशचा मृतदेह रिक्षात टाकून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारी येथील पडीक विहिरीत टाकून देऊन दोघे पसार झाले. असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. खुनामागचे नेमके कारण काय? याच शोध पोलीस घेत आहेत.

मंगळवारी मृतदेह आढळल्यानंतर वळसंगच्या पोलिसांनी वृत्तपत्र, व्हॉट्सअप आणि ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली होती. तेव्हा मयताच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटून खुनाला वाचा फुटली. तसेच सीसीटीव्हीच्या फुटेज देखील पोलिसांना आरोपी गाठण्यात यश आले. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पुढील तपास सहायक निरीक्षक अतुल भोसले करीत आहेत .

 

□ सोरेगाव जवळ रिक्षा उलटून तिघे जखमी

सोरेगाव ते हत्तुर दरम्यान भारत पेट्रोल पंपाजवळ वेगाने जाणारी रिक्षा उलटल्याने सागर दत्तात्रय शेंडगे (वय २३ रा.वांगीरोड) राधिका मधुकर वाघमोडे (वय १७) आणि गायत्री दिनेश वाघमोडे (वय २० दोघी रा. कामती ता.मोहोळ) असे तिघे जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिघेजण सोलापूर ते औराद असा प्रवास करीत होते. पेट्रोल पंपा जवळ चार चाकी वाहन कट मारल्याने रिक्षा उलटून हा अपघात झाल्याची नोंद विजापूर नाका पोलीसात झाली आहे .
□ चाकूने मारून घेतल्याने महिला जखमी
घरगुती भांडणातून स्वतः चाकूने  हातावर मारून घेतल्याने ऐश्वर्या सुहास सावंत (वय २१ रा.स्वागत नगर, कुमठा नाका) ही विवाहिता जखमी झाली.ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात. आले एमआयडीसी पोलिसात याची नोंद झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #murdered #youth #Kumbhari #identified #Both #remanded #custody, #कुंभारी #खून #तरुण #ओळख #पटली #दोघांना #सुनावली #कोठडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उसाच्या ट्रॅक्टरला धडकून टेंपो चालकाचा मृत्यू
Next Article राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे गृहमंत्रीपद जाणार?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?