मुंबई : महाविकास आघाडीत सध्या धुसफूस सुरु असल्याची माहिती आहे. शिवसेनेने गृहमंत्रीपद आपल्याकडे मागितल्याने बैठका सुरु झाल्या आहेत. यावर बोलतांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद हवे असल्याची चर्चा अधिवेशनात सुरु होती. दरम्यान, शिवसेनेला गृहमंत्रीपद आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.
शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं सेनेला मिळावं, अशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भावना आहे. गृहखातं भाजपबद्दल सॉफ्ट असल्यानं शिवसेनेची तीव्र नाराजी असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात गृहखातं कमी पडत असल्याची शिवसेनेची भावना आहे. प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या प्रकरणात कारवाई न झाल्यानं शिवसेनेची नाराजी असल्याचं बोललं जात आहे. किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर यांच्यावर गंभीर आरोप होऊनही कुठलीही कारवाई न झाल्यानं शिवसेनेचे नेते नाराज आहेत.
या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे वृत्त आहे. गेले काही दिवस महाविकास आघाडीतले अनेक नेते गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली आहे. त्यानंतर वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येत आहेत. थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी दोघांची भेट होणार असल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचारांच्या मुद्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई नसल्याची धुसफुस राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेत सुरू होती. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावरून निशाणा साधला आहे.
NCP will get the post of Chief Minister and Shiv Sena will get the post of Home Minister?
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महाविकास आघाडीची अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शिवसेना- राष्ट्रवादीमध्ये अदलाबदलांची वेळ आली आहे का ? म्हणजे राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे गृहमंत्रीपद असा काहीसा विचार सुरू आहे का? कारण राष्ट्रवादी काॅंग्रेस मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असल्याची चर्चा अर्थसंकल्प अधिवेशनात देखील होती.
किरीट सोमय्या काय गृहमंत्री आहे का ? तुम्ही पुरावे जमवा. त्यानंतर केंद्रीय तपास संस्था ऐकत नसतील. तर न्यायालयात जा. तिकडे लगेच न्याय मिळतो. तिकडे आजही संविधानाचा सन्मान होतो. त्यासाठी गृहमंत्री पदाची काय आवश्यकता? या उलट मुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद मागणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था झाली असल्याचीही टिका मुनगंटीवार यांनी केली आहे.
दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशात एक फोटो टाकून शिवसेनेकडेच ठेवावे असे मी मुख्यमंत्र्यांना सुचवले होते. #ShivSena #uddhavThackeray #Homeminister अशी पोस्ट टाकली आहे.
शिवसेनेला गृहमंत्रीपद आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद अशी अदला बदलाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जोरदार मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रिपद स्वत:कडे ठेवले होते. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी देखील गृहखाते स्वत:कडे घ्यावे, असेही खैरे म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात ईडीची कारवाई हे गृहखात्यावरचं आक्रमण आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. त्यांचं हे वक्तव्य राष्ट्रवादीला उद्देशून होतं का? अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. राऊतांनी म्हटलं की, गृहखात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा घुसतात. हे खरंतर गृह खात्यावरचं आक्रमण आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या अदलाबदलीची शक्यता वर्तवली जात होती. गृहखातं भाजपबाबत मवाळ असलेल्या सेना अस्वस्थ, काॅंग्रेसच्या नेत्यांवरही कारवाई झाल्याने ते देखील नाराज असल्याची माहिती समजत होती. भाजपचे नेते, नारायण राणे, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, नितेश राणे, मोहित कंबोज या सगळ्यांबाबात कारवाया करताना पोलिसांनी कारवाई सुमार राहिल्याची काही नेत्यांनी टिका केली होती.