मुंबई : सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्री विशाखा सुभेदारने हा शो सोडला आहे. यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून विशाखाने ही माहिती दिली. यामुळे प्रेक्षकवर्ग नाराज झाला आहे. “स्किट व्यतिरिक्त वेगळ्या धाटणीच काम करायचं आहे. आता तूर्तास जत्रेतून राम राम पण नक्कीच दुसऱ्या भूमिकेतून दिसेनच”, असं विशाखाने मत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राला विनोदाचा मोठा वारसा आहे. नाटक. चित्रपट यापाठोपाठ मालिका विश्वानेही हा वारसा जपला. म्हणूनच प्रत्येक मराठी वाहिनीवर कौटुंबिक मालिकांसोबतच विनोदी कार्यक्रम ही आवर्जून दाखवले जातात. हसा चकट फू, टिकल ते पोलिटिकल पासून हास्यसम्राट, फु बाई फु , कॉमेडी एक्स्प्रेस, बुटेल ट्रेन, चला हवा येऊ द्या ते घराघरात धुमाकूळ घालणारी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा; अशी बरीच लांबलचक यादी आहे.
गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवले. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे ‘समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार’ यांची जोडी, ही जोडी मंचावर आली की हसून डोळे पाणवणार हे निश्चित असते. अनेक पात्र, नाना तर्हेचे विनोद करून यांनी आपल्याला लोटपोट केले. पण आता मात्र या जोडी प्रेक्षकवर्ग आता मुकणार आहे.
Visakha Subhedar leaves ‘Maharashtrachi Hasya Jatra’ show
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
विशाखा सुभेदारने तिच्या विनोदी अभिनयाने ‘फू बाई फू’, ‘बुलेट ट्रेन’ आणि ‘हास्यजत्रा’ या कार्यक्रमांच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवला आहे. अभिनयासोबत विशाखा आपल्या नृत्यामुळेदेखील ओळखली जाते. विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले या हास्यजत्रेतील जोडीवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता मात्र ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही.
विशाखा सुभेदारच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग सुरू आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केले आहे. तर पॅडी कांबडे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकाची निर्मातीदेखील विशाखा सुभेदारच आहे.
विशाखा सुभेदारने लिहिले आहे,”जा आता’…असं म्हणण्यापेक्षा ‘अर्रर्रर्रर्र’ हे ऐकायला छान वाटतं. मंडळी थोडं स्किट व्यतिरिक्त काम करायचा विचार आहे. वेगळ्या धाटणीचं काम करायचं आहे. लवकरच नव्या भूमिकेत दिसेन. माझ्यातल्या अभिनेत्रीच्या आणि नाटक निर्मातीच्या असंच पाठीशी रहा”. विशाखाने पुढे लिहिले आहे,”मंडळी हा प्रवास खरंच सोपा नाही. मी उत्तम विनोदी अभिनेत्री कधीच नव्हते. पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय वेगळं करता येईल याचा शोध घेऊन ते प्रामाणिकपणे सादर करण्याचा प्रयत्न मी करत आले आहे”.