अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील एका शेतकर्याच्या केळीच्या बनात एक मादी व एक बछडा बिबट्या आढळला. ही माहिती वा-यासारखी पसरल्यानंतर नाविंदगीसह पंचक्रोशीत एकच घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सोलापूर वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाविंदगी येथील शेतकरी सचिन स्वामी यांच्या केळीच्या बनात सकाळी 10 वाजणेच्या सुमारास एक मादी व बछडा बिबटा आढळून आल्याची माहिती मिळताच उप वनसंरक्षक धैर्यशील पाटील यांचे पथक दाखल झाले.
सहाय्यक उपवनसंरक्षक लक्ष्मण आवारे यांच्या नेतृत्वाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सोलापूर दीपक खलाणी, अक्कलकोटचे वनपान आर.ए.कांबळे, उत्तरचे वनपाल एस.बी.कुताटे, वन रक्षक मुख्यालय सोलापूरचे श्रीशैल पाटील, वनरक्षक तुकाराम बादणे, संदीप मेंगाळ,शुंभागी कोरे, यशोदा आदलिंगे, गंगाधर विभुते, नरेंद्र दोडके, रविकांत ढब्बे, प्रााणी मित्र राजकुमार कोळी यांच्यासह पुणे येथील रेस्क्यू टीमचे पथक दाखल होवून संबधित शेतकर्याच्या केळीच्या बनाची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली.
पाहणी केली असता बिबट्या व बछडा आढळून आला नाही. या ठिकाणी वन विभागाने दोन जाळी लावल्या. गेल्या 7 ते 8 तासापासून ‘ऑपरेशन फॉरेस्ट’ ची शोध मोहीम सुरु आहे. मध्यरात्री पर्यंत बिबट्याला जेरबंद करण्याकरिता वन विभागाची टीम कार्यरत असल्याचे सहा. उप वन सरंक्षक लक्ष्मण आवारे यांनी सांगितले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बि एच काकडे , पीएसआय बाडीवाले व सर्व स्टाप प्रयत्न करीत आहे.
Leopard and calf spotted in banana plantation in Akkalkot, search operation begins
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
घटनेची माहिती मिळताच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नियोजित कामे सोडून तातडीने नाविंदगीकडे घटनास्थळी रवाना झाले. त्या ठिकाणी जावून घटनेची पाहणी केली. सहा. उपवन संरक्षक लक्ष्मण आवारे, वनपाल अक्कलकोट आर.ए.कांबळे यांच्याकडून माहिती घेवून शासन स्तरावरुन लागणारी मदत तातडीने उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. नागरिकांशी संवाद साधून घाबरून न जाण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणे पुणे येथील रेस्क्यू टीम नाविंदगी येथील घटनास्थळी दाखल झाली आहे. याकामी शोध मोहीम जलदगतीने सुरु असल्याचे वन विभागाने सांगितल.
गेल्या काही महिन्यापूर्वी याच भागातील कल्लहिप्परगे येथे गवा आढळून आला होता. वन खात्याने त्यावेळी देखील सदर गावात ठाण मांडून होते. सदरची माहिती शासनाने त्वरीत मागवून घेतल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत बोलताना आर.ए.कांबळे वनपाल अक्कलकोट यांनी सदरचा बिबट्या व बछडा हे दोघे नजीकच्या कर्नाटक राज्यातून आलेले आहे. यांना पकडण्याकामी वन विभाग सतर्क असून लवकरच जेरबंद करु असे, सांगितले.
“सकाळी दहा वाजता उसाच्या पिकाला पाणी देऊन नंतर केळीला पाणी देण्यासाठी आत गेल्यानंतर पाणी बघण्यासाठी कौलारी कडेस गेलो, तिथ बिबट्याचे प्रथम पाठ दिसली. मी त्यावेळी पंधरा फूट अंतरावर होतो. घाबरून मी पळून गेलो, शेजारील व्यक्तींना व वनविभागाला सांगितले”
सचिन स्वामी, नाविंदगी – शेतकरी