□ ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे वनविभागाकडून आवाहन
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथे काल शुक्रवारी सचिन स्वामी यांच्या शेतात केळीच्या बनात एक मादी व एक बछडा बिबट्या दिसून आला होता. वनविभागाने तत्परता दाखवता तपास केला. यावर पायाच्या ठशावरुन नाविंदगी भागात बिबट्याचा वावर झाल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे गावक-यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
काल शुक्रवारपासून नाविंदगीसह पंचक्रोशीत वनविभागाचे कर्मचारी तळ ठोकून आहेत. काही जणाकडून बिबट्या नसून बिबट्यासारखा दिसणारा अन्य प्राणी असल्याचे सांगण्यात येत होते. आता खुद्द वनविभागाच्या पथकाच्या पाहणीनंतर व बिबट्याच्या पायाच्या ठशावरुन नाविंदगी भागात बिबट्याचा वावर असल्याचे सिध्द झाले आहे.
यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी या भागात वनविभागकडून सध्या शोध मोहिम आणखी गतिशील केली आहे. अजूनही तीन चार दिवस वनविभागाचे कर्मचारी याभागातच तळ ठोकून राहणार आहेत. हा संपूर्ण प्रसंग पाहून या भागातील ग्रामस्थ मात्र भयभीत झाले आहेत.
Akkalkot: Proof of leopard movement in Navindagi area from footprints
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोलापूर वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाविंदगी येथे एक मादी व बछडा बिबट्याचे या भागात वावर झाल्याचे सिध्द झाल्याने उप वनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक लक्ष्मण आवारे यांच्या नेतृत्वाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सोलापूर दीपक खलाणी, अक्कलकोटचे वनपान आर.ए.कांबळे, उत्तरचे वनपाल एस.बी.कुताटे, वन रक्षक मुख्यालय सोलापूरचे श्रीशैल पाटील, वनरक्षक तुकाराम बादणे, संदीप मेंगाळ,शुंभागी कोरे, यशोदा आदलिंगे, गंगाधर विभुते, नरेंद्र दोडके, रविकांत ढब्बे, प्राणी मित्र राजकुमार कोळी यांच्यासह पुणे येथील रेस्क्यू टीमचे पथक दाखल होऊन शोध मोहिम सुरु केली आहे.
वनअधिका-याच्या आवाहनासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
अजून ही बिबट्या व बछड्याला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही. यामुळे वनविभागाच्या वतीने ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे की, घाबरून न जाता सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर अजूनही तीन चार दिवस या भागात ‘ऑपरेशन फॉरेस्ट’ चे शोध मोहिम सुरुच राहणार आहे. या शोध मोहिमेत सहाय्यक उप वन सरंक्षक लक्ष्मण आवारे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग कर्मचारी व दक्षिण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एच काकडे , पीएसआय बाडीवाले कामगिरी बजावत आहेत.
“कालपासून बिबट्याची शोध मोहीम सुरु आहे. जागोजागी पिंजरा लावला आहे. बिबट्या पिंजर्यात अडकला नाही येथून पुढे बिबट्या निघून गेला आहे. बिबट्याच्या पायाच्या ठशावरुन बिबट्या या भागात आला होता हे सिध्द झाले आहे. तरी ग्रामस्थांनी घाबरुन न जाता सतर्कता बाळगावी, बिबट्या दिसल्यास वनविभागास कळवावे, शक्तिप्रदर्शन करू नये.”
दीपक खलाणी
वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर