मुंबई : महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांत शनिवारी रात्री आकाशातून आगीचे गोळे पडताना दिसले. याचे व्हिडिओही व्हायरल झाले. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी गावात लोखंडी रिंग पडली. धातूचा गोळा देखील येथे आढळला. हे सर्व चीनच्या रॉकेटचा भाग असल्याचं नासाच्या अंदाजानुसार समोर येत आहे. दरम्यान, इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पृथ्वीच्या कक्षेत चार उपग्रहाचं डेब्रीस परत येणार होतं.
खान्देशातल्या धुळे, जळगावपासून विदर्भात अमरावती, चंद्रपूरपर्यंत महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये आकाशातून आगीचे गोळे पडत होते. पहिल्यांदाच अशा प्रकारची दृश्यं पाहणाऱ्या लोकांनी मोबाईल कॅमेऱ्यात ही दृश्यं रेकॉर्ड केली. ही दृश्यं पाहून काहींना आश्चर्याचा धक्का बसला तर काही ठिकाणी भीतीचं वातावरण होतं. रात्रीची वेळ अचानकपणे आकाशात दिसलेले आगीचे गोळे आणि जोरदार आवाजामुळे लोकांची धावपळही झाली आकाशातून पडणारे आगीचे गोळे म्हणजे काहींना उल्का पडतायत असं वाटलं तर काहींना UFO अर्थात अनआयडेन्टीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स आहेत अशीही शंका आली.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात शनिवारी रात्री आकाशातून रहस्यमयी आगीचे पडताना अनेकांनी पाहिले. पहिल्यांदाच राज्य सरकारने याबद्दल माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील लाडगोरी नावाचे गाव आहे. 10 फूट व्यासाच चक्राकार, गोल अशी वस्तू पडली आहे. नेमकं ते काय याचा अभ्यास सुरू आहे, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
Dangerous! Direct Chinese connection of what fell from the sky in Vidarbha
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दहा फूट व्यासाची चक्राकार वस्तू आढळली आहे. ती वस्तू सॅटेलाईटचा भाग असल्याची शक्यता मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली आहे. वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातच ही घटना घडली. माझ्या मतदारसंघात लाडगोरी नावाचे गाव आहे. दहा फूट व्यासाची चक्राकार, गोल वस्तू पडली आहे. याचा अभ्यास सुरू आहे. सॅटेलाईटचा भाग असावा असा अंदाज आहे, पण तो पडत असताना चकाकत होता, सूर्याप्रमाणे आग ओकत असल्यासारखे दिसत होते, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
चकाकताना दिसलं अस सगळे सांगतात. एखाद्या घरावर पडलं असतं तर नुकसान झालं असत. मात्र तस झालं नाही कुठलीही जीवितहानी नाही. आता त्याचा अभ्यास केला जात आहे. पाच लोकांची टीम बनविली आहे ते माहिती घेत आहेत. काही ठिकाणी गोळे सुद्धा मिळाले त्याचीही माहिती घेत आहेत. त्यानंतर निष्कर्षापर्यंत पोहचू, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार गावात आकाशातून पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा गावात आढळला आहे. पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली. प्रशासनाने स्थानिकांशी संपर्क साधत नक्की घटनेची माहिती घेतली. आकाशातून पडलेला हा गोळा नक्की काय याबाबत मात्र चर्चांना उधाण आले आहे. तहसील प्रशासनाने गोळा ताब्यात घेत वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात ज्या ठिकाणी हे आगीचे गोळे पडले त्या ठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली.बैलगाडीच्या चाकाच्या आकाराएवढ्या लोखंडी पट्ट्या लोकांना सापडल्या. त काहींना धातूची गोलाकार वस्तूही सापडली. लोखंडी गोलाकार वस्तू चीनच्या रॉकेटचं डेब्रीस असल्याचं समोर आलं आहे. इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पृथ्वीच्या कक्षेत चार उपग्रहाचं डेब्रीस परत येणार होतं.