मुंबई : राज ठाकरे यांनी कालच्या सभेत मस्जिदीसमोरील भोंगे काढले नाही तर आम्ही हनुमान चालीसा लावू असे विधान केले होते. या विधानावर सुजात आंबेडकर यांनी मिश्किल टोमणा मारला आहे, ते म्हणाले की राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी अमित ठाकरे यांना दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्याला सर्व मशिदी बाहेर भोंगा लावून हनुमान चालिसा मंत्र वाजवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते यावरून वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजाता आंबेडकर यांनी थेट राज ठाकरे यांना आपले पुत्र अमित ठाकरे यांना सर्व मशिदीबाहेर हनुमान चालिसा म्हणायला लावा अशी टीका सुजात आंबेडकरांनी केली. राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे.
सुजात आंबेडकर म्हणाले, ‘सध्या रमजानचे दिवस आहेत. काल कोणीतरी एक वक्तव्य केलं की मशिदीवर मोठे भोंगे लावले तर मी पोरांना तिकडे जाऊन हनुमान चालिसा म्हणायला लावेल. मला यांना एवढीच विनंती करायची आहे की माझा तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा. मला तिकडे एकही बहुजन पोरगा नको आहे. जितकी लोकं हनुमान चालिसा म्हणायला जात आहेत त्यांनी टी-शर्ट काढून जाणवं दाखवावं, मग हनुमान चालिसा म्हणा,’ असंही सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.
First Amit Thackeray should show it as Hanuman Chalisa – Sujat Ambedkar
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गुढीपाडव्या दिनी आयोजित सभेत राज ठाकरे म्हणाले होते की, ‘कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा.’
दरम्यान, तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लिम दंगलीवर उभा करू नका. तुम्ही स्वत:चा पक्ष उभा भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, अशी बोचरी टीका सुजात आंबेडकरांनी केली. सुजात आंबेडकरांच्या आव्हानाला अमित ठाकरे यांनी आणखी प्रत्युत्तर दिले नाही.
घाटकोपरच्या परिसरात मनसैनिकांनी मशीदीसमोर भोंगेही लावले, काही तासातच हे भोंगे पोलिसांनी काढले. राज ठाकरेंच्या आवाहनावर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरेंना आधी हनुमान चालीसा बोलायला लावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर पक्ष भाड्याने लावून प्रचार करत फिरा, पण हिंदु मुस्लिम दंगलींवर आपला पक्ष उभारू नका असेही आवाहन त्यांनी राज ठाकरेंना केले आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये सुजात आंबेडकर सक्रीय होत आहे. त्याची सुरूवात कुर्ला येथे एका बाईक रॅलीच्या माध्यमातून सुजात आंबेडकरांनी केली.