मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजोबा झाले आहेत. राज ठाकरे यांच्या सूनबाई आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. त्यामुळे शिवतीर्थ निवासस्थानी आनंदाचं वातावरण आहे. आज मंगळवारी सकाळी मिताली ठाकरे यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आई – मुलगा दोघंही सुखरुप आहेत.
मनसे नेते अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांनी पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. शिवतीर्थावर नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ठाकरे कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून मिताली ठाकरे या ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल होत्या. आपल्याला नातू झाल्याची माहीती मिळताच राज ठाकरे ब्रीच रुग्णालयात पोहोचले आहेत. राज ठाकरेंच नवं घर शिवतीर्थ येथे या नव्या पाहुण्याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच राज ठाकरे ‘कृष्णकुंज’वरुन ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी शिफ्ट झाले आहेत.
मंगळवारी सकाळी राज ठाकरेंची सून मिताली ठाकरे यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मुंबईतील ब्रीच कँन्डी हॉस्पिटलमध्ये आई-मुलगा दोघंही सुखरुप आहेत. अमित ठाकरेंना पुत्ररत्न झाल्याचं समजताच शिवतीर्थावर पेढे वाटप करण्यात आले. नातवाच्या आगमनाने राज ठाकरे आजोबा तर शर्मिला ठाकरे या आजी झाल्या आहेत.
On Shivteertha, Anand Raj Thackeray became grandfather, Amit became father
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. पक्षाच्या कामासह राज ठाकरेंच्या खांद्याव आजोबा म्हणून नवीन जबाबदारी आली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर आता गोंडस बाळ आल्यामुळे अमित ठाकरेंच्या सासर आणि माहेरच्या दोन्हीकडील पाहुणे आनंदात आहेत. अमित ठाकरेंची पत्नी मिताली ठाकरे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात आता राज ठाकरे स्वतः दाखल झाले असून हळूहळू परिवरातील मंडळीदेखील पोहोचले आहेत.
मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत अमित ठाकरे बाबा झाल्यामुळे अमित ठाकरे आणि कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजोबा झाले. माझा नेता अमित ठाकरे बाब झाले आणि आम्ही काका झालो खूप अभिनंदन अशा आशयाचे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे.
27 जानेवारी 2019 रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला. लोअर पर सेंट रेजिस हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला.