बार्शी : नमाज पठणाची वेळ वाढविण्यावरुन झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात झाले. यात सातजणांनावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोलापुरातील बार्शी तालुक्यात घडली.
फारूख रज्जाक सौदागर (रा. मंगळवार पेठ, बार्शी) यांना कोयता आणि दगडाने मारहाण झाली. त्यांच्यावर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पीटल येथे उपचार चालू आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वहाब ईस्माईल सौदागर , आयाज ईस्माईल सौदागर, शहानवाज वहाब सौदागर, रेहान फयाज सौदागर , मुस्तकीन आयाज सौदागर, फरहान रियाज सौदागर, सर्फराज वहाब सौदागर (सर्व रा. मंगळवार पेठ, बार्शी) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवार पेठेतील नुरी मशिदीमध्ये सायंकाळी 05/00 वाजणेचे सुमारास रोजा सोडण्याकरिता व नमाजाकरीता सर्वजण जमले होतो. त्यावेळी वहाब ईस्माईल सौदागर व आयाज ईस्माईल सौदागर यांनी नमाज पठण करावयाचा वेळ वाढवा, असे म्हणून मशीदचे ट्रस्टी फरीद खलील सौदागर व फिर्यादी सोबत शिवीगाळी व बाचाबाची केली.
त्यानंतर उपवास सोडून नमाज पठण करून सर्वजण आपापले घरी गेले. त्यानंतर रात्री 10/00 वा. चे सुमारास सायंकाळी मशिदीत झालेली तक्रार मिटवणे करीता फिर्यादी, जुबेर महेताब सौदागर व सद्दाम फरीद सौदागर असे तिघेजण आयाज सौदागर यांचे घराकडे जात असताना आयाज हा विठठल परदेशी यांचे घराचे समोर रोडवर थांबला असल्याने ते त्याचेजवळ गेले. त्यास रमजानचा पवित्र महिना चालू आहे, उगाच आपल्या आपल्यात भांडण, तक्रारी नको, आपण मिटवून टाकू असे म्हणत समजूत घालत होते.
Stone pelting for extending Namaz recitation time, case filed against seven persons
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याचवेळेस आयाज याने भाऊ, पुतणे व नातेवारईकांना हाका मारुन लवकर या, फारुख आयता आला आहे, याला आता संपवूनच टाकू असे म्हणताच या सर्वानी कोयता, काठी, दगड घेवून आले. त्यांनी फिर्यादीस जबर मारहाण केली. ते खाली पडल्यानंतर जुबेर सौदागर व सद्दाम सौदागर हे सोडविण्याकरीता मध्ये आले असता त्यांना देखील लाथा बुक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.