मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचा मुलगा निल सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर 57 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. आता त्यावरून माजी सैनिक बबन भोसले यांनी मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, सोमय्या यांच्यावर आयपीसीच्या कलम 34, 406 आणि 420 अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या पैशात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर माजी सैनिक बबन भोसले यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात काल मध्य रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
आयएनएस युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर संजय राऊत यांनी केला आहे. माजी सौनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी बबन भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह काल संध्याकाळी अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बबन भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
Somaiya father files case against son in Mumbai
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईत राऊतांचे अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील १ फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. यानंतर राऊतांनी काल (६ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या पैशात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
राऊत म्हणाले, “भाजपने आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी प्रचार केला आणि लोकांकडून पैसे उकळले. हे पैसे राज्यपालांकडे सुपूर्त करू असे सोमय्यांनी सांगितले. परंतु, जमा केलेले पैसे राज्यपालांपर्यंत पोहोचले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. राऊत पुढे असे देखील म्हणाले, आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवलेल्या माहिती हे उघडकीस आले. हा देशद्रोह आहे, त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेने यांचा तापास करावा. सोमय्या हे सीए असल्यामुळे त्यांना माहिती आहे की, पैसा कसा पचवायल हे माहिती, असे ते म्हणाले.
यावर किरीट सोमय्या यांनीही संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना द्यावेत, आतापर्यंत १७ आरोप केलेत त्याच काय झालं? असा सवालही त्यांनी विचारला.