पुणे : गेल्या काही दिवसांपासून भोंग्याच्या प्रश्नावर मनसेत दोन गट पाहायला मिळत होते. वसंत मोरे यांच्या नाराजीच्या अनेक चर्चा समोर येत होत्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना पुणे मनसे शहराध्यक्ष या पदावरून काढले आहे. साईनाथ बाबर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मोरे यांनी मशिदींवरील भोग्यांच्या प्रश्नांवरून राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली होती.
वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष या पदावरून हकालपट्टी केल्यानंतर साईनाथ बाबर यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. साईनाथ बाबर हे पुण्यातील मनसेचे नगरसेवक आहेत. तसेच त्यांच्याकडे मनसेचे गटनेते हे पद सुद्धा आहे. मनसेचा एक धडाकेबाज कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नावरून पुणे येथील मनसेमध्ये दोन गट निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यानंतर मोरेंना हटवण्यात आले.
वसंत मोरे यांनी या प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली नाही तर उलट हटके शुभेच्छा दिल्या आहेत. “आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड खुप खुप अभिनंदन साई… असा फोटो टाकून शुभेच्छा दिल्या.
Raj Thackeray fires Vasant More; Best wishes from Vasant More
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राज ठाकरेंनी गुरुवारी वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरुन हटवलं आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर यांना पुणे शहराध्यक्ष करण्यात आले आहे. वसंत मोरेंनी ट्विट करत साईनाथ बाबरचे अभिनंदनसुद्धा केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर पुणे मनसेमध्ये भूमिकेचे पालन न करणारे वसंत मोरे यांच्याविरोधात राज ठाकरेंनी कठोर भूमिका घेतली आहे. वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. राज ठाकरेंची भोंग्यांविरोधातील भूमिका समजली नसून मशिदींसमोर भोंगे लावण्यात येणार नाही असे वसंत मोरे यांनी म्हटलं होते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. कारण वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदार मुस्लिम आहेत. यामुळे दोघांसमोरही पेच निर्माण झाला होता. वसंत मोरेंच्या नाराजी नाट्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थावर येण्याचे आदेश दिले होते. यामध्ये नगरसेवक साईनाथ बाबर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांचा समावेश होता. वसंत मोरे यांना टाकले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/Egqw962ZIx
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 7, 2022
मनसेच्या अधिकृत पेजवरुन ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये असे म्हटलं आहे की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!” आशा आशयाचे ट्विट मनसेनकडून करण्यात आले आहे.
वसंत मोरे यांनी आपल्याला पुणे शहर अध्यक्ष पदावरुन हटवल्यावर ट्विट केलं आहे. नवे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचे त्यांनी अभिनंदन केलं असून मी कधीपासूनच तुझा मावळा आहे असे म्हटलं आहे. ट्विट करत वसंत मोरे म्हणाले की, अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड, खूप खूप अभिनंदन साई! अशा आशयाचे ट्विट वसंत मोरे यांनी केलं आहे.
"अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड!
खूप खूप अभिनंदन साई!@Sainathbabar7 pic.twitter.com/Qkar8mCakS— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 7, 2022