□ अनिल देशमुखांची पाठराखण
सोलापूर : राज्यात अनेक प्रश्न असताना धर्मा-धर्मात भांडण लावण्याचे कारस्थान सुरू आहे. भारत देश इंग्रजांच्या ताब्यात असताना भारतीय नागरिकांना न्याय मिळत होता, आता मात्र न्याय मिळणे अवघड झाले. मात्र आज तुमची वेळ आहे, उद्या आमचीही वेळ येईल, असा इशारा छगन भुजबळ यांनी भाजपला दिला आहे.
सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषद यांच्या संयुक्त बैठकीत मंत्री छगनराव भुजबळ बोलत होते. छगन भुजबळ सोलापूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, की भाजपा सारखा विरोधी पक्ष आजतागायत पहिला नाही. चूक नसताना विरोधी पक्षाकडून ईडी किंवा सीबीआय सारखे चौकशीचे भुंगे लावून मंत्र्यांना तुरुंगात घातले जात आहे. ईडीची भीती महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांना दाखवली जात असल्याचेही सांगितले.
महाराष्ट्र आहे घाबरणार नाही, हा महाराष्ट्र आहे, कोणत्याही बाबतीत घाबरणार नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुढे जाणार आहे. राज्याला अडचणीत आणण्याचे कार्य केले जात आहेत. तरी अशा अडचणीवर मात केली जाणार असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
भारत देश इंग्रजांच्या ताब्यात असताना भारतीय नागरिकांना न्याय मिळत होता, आता मात्र न्याय मिळणे अवघड झाले. मात्र जो घाबरला तो संपला, त्यामुळे आम्ही लढत राहणार असल्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांना दिला.
आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय असून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. इथून पुढे देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत देखील राज्य सरकार सकारात्मक असणार आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन राज्य सरकार करणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला मग आज हे आंदोलन करण्याची गरज काय असा प्रश्न देखील मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
Today is your time, tomorrow will be our time too: Chhagan Bhujbal
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार यांनी सातत्याने बैठका घेतल्या होत्या ते कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आहेत मात्र काही मंडळीनी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नसल्याचे सांगितले.
□ अनिल देशमुखांची पाठराखण
छगन भुजबळ यांनी पंढरपुरात बोलताना गृहमंत्र्यांना कोण देते 100 कोटी? देते असा प्रतिसवाल उपस्थित केला. मीही गृहमंत्री होतो, अशा शब्दात अनिल देशमुख यांची पाठराखण केली. भुजबळ म्हणाले की, अनिल देशमुख आणि दुसरी व्यक्ती म्हणे असे बोलले, हे तिसरा चौथ्याला सांगतो. अनिल देशमुख कोणाला बोलले, आपण लांबून ऐकले पण आपणास बोलले नसल्याचे सचिन वाझे याने चांदीवाल कमिशनला सांगितले होते. पण त्यांच्यावर काही करून मोठ्या रकमांचे आरोप ठेवायचे, मग ईडीची केस करायची आणि जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये ठेवायचा हा सर्व ईडीचा प्रकार असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.
न्यायालयाचाही यामुळे नाईलाज होतो, असे सांगताना पैसे गेले कुठे ? कोणी वसूल केले? काही सापडले का तुम्हाला? असा सवालही भुजबळ यांनी केला. असे सांगोपांगीवर केस उभी राहते आणि त्यानंतर अटक होते. हे आपण यापूर्वी 50 वर्षात कधी पहिले नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.