मुंबई : वकील गुणरत्न सदावर्तेंना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या बंगल्यावर झालेल्या चप्पल आणि दगडफेकीनंतर पोलिसांनी काल (8 एप्रिल) अटक केली. त्यानंतर त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबई पोलीस दादागिरी करत आहेत. आमच्या कुटुंबाला मुंबई पोलिसांकडून जीवास धोका आहे. त्यांच्यावर शरद पवार यांचा दबाव आहे. कर नाही त्याला डर कशाला?” असे जयश्री पाटील म्हणाल्या.
‘शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन आणि निदर्शने प्रकरणी मुंबई पोलिसांनी तब्बल १०७ लोकांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर अटकेची कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांनी ताब्यात घेताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी मला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माझ्या पत्नीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या जीवाला धोका असून माझी हत्या होऊ शकते असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी वकील जयश्री पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हणाल्या, “कर नाही त्याला डर कशाला.
While changing clothes, the female police officer entered my bedroom and asked, “Why are you afraid of him?”
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पोलिसांचा मोठा फौजफाटा घरात घुसल्याचा आरोप वकील जयश्री पाटील यांनी केला आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या, अनिल देशमुखांना जेलमध्ये पाठवलं, त्याचा बदला शरद पवार घेत आहेत. पोलीस घरी चौकशी आले. चौकशीला आम्ही तयार होतो. कर नाही त्याला डर कशाला!. मी कपडे बदलत असताना महिला पोलीस माझ्या बेडरूममध्ये घुसल्या. माझ्या कुटुंबाला धोका आहे.
सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील आपल्या तान्ह्या बाळासह आणि १० वर्षीय मुलगी झेन गावदेवी पोलीस ठाण्यात हजर आहेत. जयश्री पाटील यांनी मुंबई पोलीस दादागिरी करत असून शरद पवारांचा दबाव आहे. मुंबई पोलिसांकडून देखील आमच्या कुटुंबाला धोका आहे अशी संतप्त प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली होती.
मला माझ्या पतीला भेटू देत नाहीत. त्यांना अतिरेकी असल्यासारखं घरातून घेऊन आले, कोणतीही माहिती न देता त्यांना अटक करणयात आली. हे शरद पवार यांचे षडयंत्र आहे. ते ताकदीचा चुकीता वापर करतायत. शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी दबाव आणण्यासाठी हे केल्याचा गंभीर आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. इतकंच नाहीतर माझ्या पतीच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्यासाठी शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार जबाबदार असतील, या तिघांकडून माझ्या पतीच्या जीवाला धोका असेही जयश्री पाटील यांनी म्हटले आहे.
While changing clothes, the female police officer entered my bedroom and asked, “Why are you afraid of him?”