मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई केली. सदावर्ते यांच्यासह ताब्यात घेतलेल्या शंभरहून अधिक आंदोलकांना आज मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सदावर्ते यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अन्य 109 संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
न्यायाधीश सावंत यांच्या समोर ही सुनावणी झाली. न्यायाधीश सावंत यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे आदेश दिले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी हल्ला झाला. याप्रकरणी शुक्रवारी रात्री ॲड. गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. तसेच अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या सर्वांना आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने सदावर्तेना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर 109 जणांना मात्र न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि.8) थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई रोषातून सुरू असल्याचं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्यावतीेने 14 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून झाल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Gunaratna Sadavarten to police custody; 109 people in judicial custody
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सरकारने कामगारांबाबत योग्य भूमिका नव्हती. पहिल्या दिवसांपासून कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नव्हत्या. कित्येक कामगारांनी आत्महत्या केली. मात्र सरकारने त्यांची दखलही घेतली नाही. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका कायम सरकारच्या विरोधात राहिली आहे. हायकोर्टात सदावर्तेंवर हल्लाही झाला आहे. सदावर्ते हे एक प्रसिद्ध वकील आहेत. सदावर्तेंकडे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्याही केसस आहेत, असे सदावर्तेंच्या वकीलाचे म्हणणे आहे.
न्यायालयाचा निकाल ७ तारखेला आला. त्यावेळी गुणरत्न सदावर्तेंनी आक्षेपार्ह भाषण केले असे जबाबात म्हटलं आहे. मात्र गुन्ह्यातील जबाबात वापरलेले शब्द आणि प्रत्यक्षात गुणरत्न यांनी म्हटलेलं वाक्य यात तफावत आहे. गुन्ह्यात शरद पवारांच्या बंगल्यात घुसण्याची भाषा केली आहे. मात्र मुलाखतीत तसे शब्दच वापरलेले नाहीत, असा युक्तीवाद गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांमार्फत केला.
कामगार शांततेत आंदोलन करत होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना परवानगी दिली होती. जयश्री पाटील यांनीही १०० कोटी वसूली मलबार हिल प्रकरणात तक्रार दाखल केली असून याचिकाही दाखल केलीय. याचच कुठेतरी रोष या कारवाईतून दिसतोय. म्हणूनच अटकेची कारवाई करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. आम्ही कामगारांची बाजू कोर्टात मांडली. सरकारला कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. म्हणून रोषातून सरकार कृत्य करत आहे, असं सदावर्तेंचे वकील म्हणाले.
एसटी कामगारांच्या आंदोलनामागे दुसरा व्यक्ती आहे. काही व्यक्तींच्या चिथावणी खोर वक्तव्यांमुळे आंदोलन केले जाणार होते. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या बाबतीत वारंवार वक्तव्य केली जात होती. रॉयल स्टोन येथेदेखील आंदोलन होणार होते. कामगारांच्या कालच्या हिंसक आंदोलनाचे सिसीटीव्ही फुटेज घटना स्थळाचे जप्त केले आहेत. यामागे काही लोकांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयात सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी राज्य सरकारची बाजू मांडली.
आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यांत दोन पोलिस जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. पोलिसांनी 103 आंदोलक कर्त्यांना अटक केली आहे. त्यापैकी अनेकांनी खोटी नावे सांगितली असून पत्तेही चुकीचे सांगितले आहेत. त्यामुळे, त्यांची पुर्ण नावे आणि खरे पत्ते शोधून काढायचे आहेत. या अटक कर्मचाऱ्यांत खरंच एसटी कर्मचारी होते की, बाहेरचे कोणी होते, याचाही तपास करायचा आहे. म्हणून 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.
दरम्यान, सदावर्ते यांच्या अटकेच्या निषेधार्थ खामगांव येथील एसटी कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
□ वकील सदावर्ते भाजपची भाषा बोलत होते – रोहित पवार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक ही शरद पवार यांची खासगी मालमत्ता आहे, पवार यांच्याकडे या सरकारमध्ये कोणतेही पद नाही, न्यायालयाने एसटी संपाबाबत निकाल दिल्यानंतर कर्मचारी माघारी परतायला तयार होते, पण त्यानंतर सदावर्ते आझाद मैदानात गेले आणि यावेळी त्यांनी भाजपप्रणित भाषण केले, ते भाजपची भाषा बोलत होते, रोहित पवार म्हणाले.